Coronavirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘फ्री’मध्ये ‘हे’ 5ऑनलाइन कोर्सेस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करोना व्हायरसमुळे संपूर्ण जगच लॉकडाऊनसारख्या स्थितीत आहे. पण अशा काळात काही ऑनलाईन कोर्सेस करून तुम्ही तुमच्या ज्ञानात भर पाडू शकता आणि वेळेचा सदुपयोग देखील करू शकता. यावेळी आयआयटी दिल्ली आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अनेक मोफत कोर्सेस उपलब्ध करून देत आहेत. तुम्ही ते करू शकता. जाणून घेऊया अशा काही कोर्सेस बद्दल…

आर्टिफिशल इंटेलिजन्स

आयआयटी दिल्लीने आर्टिफिशल इंटेलिजन्सवर मोफत ऑनलाइन कोर्स उपलब्ध करून दिला आहे. हा कोर्स नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग (NPTEL) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या फिल्डमधील विविध कन्सेप्टवर कोर्स आहेत. यात एआयच्या फिलॉसॉफीवर चर्चा करण्यात आली आहे. अनेक अल्गोरिदमबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा बेसिक कोर्स विद्यार्थ्यांना खूप उपयोगी ठरू शकेल. हा कोर्स केल्यानंतर त्यांना आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या अन्य क्षेत्रात अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स करता येईल.

GATE ची परीक्षा

जर तुम्ही GATE ची परीक्षा देऊ इच्छित आहात तर यावेळेचा उपयोग तुम्ही या परीक्षेच्या तयारीसाठी नक्की करू शकता. NPTEL च्या वेबसाइटवर साइन अप करून तुम्ही गेट परीक्षेच्या तयारीसाठी मोफत गाईडच्या सुविधेचा वापर करू शकता. येथे प्रत्येक विषयाचा मागील वर्षीची गेटची प्रश्नपत्रिका मिळते. ती तुम्ही डाऊनलोडही करू शकता.

फोटोजर्नालिझम

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा एक फोटोजर्नालिझमवरील ऑनलाइन कोर्स आहे. फोटोग्राफीची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स खूपच फायदेशीर ठरेल. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ऑनलाइन ट्युटोरिअल पोर्टलवर हा कोर्स उपलब्ध आहे तसेच स्वयं वेबसाइटवरही या कोर्स उपलब्ध आहे.

मास मीडिया

जर तुम्ही मास मीडियासाठी लिहिण्यास इच्छुक आहात, तर स्वयंच्या ऑफिशिअल पोर्टलवर जाऊ शकता. तेथे मोफत ऑनलाइन क्लासेस उपलब्ध आहेत. तेथे अनेक स्टडी मॉड्युल उपलब्ध आहेत उदाहरणार्थ नॅरेशन, क्रिएटिव्ह रायटिंग, पुस्तके, मॅगझीन आणि रेडिओवर लिहिण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल.

न्यूट्रिशन एक्स्पर्ट

आपल्या खाण्याची शैली आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. अलीकडे आपल्या खाण्या-पिण्याच्या शैलीत खूप बदल झाले आहेत. पोषक आहारावरदेखील अनेक ऑनलाइन कोर्सेस असतात. स्वयं पोर्टलवरही खाणं आणि लाइफस्टाइलवर प्रकाश टाकणारा एक कोर्स आहे. यात खाणं, पोषण, डाएट, खाद्यसुरक्षा आदी विषयांवरची माहिती आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी स्वयं पोर्टलवर साइन अप करावे.

You might also like