Coronavirus : मुंबईकर धास्तावले ! धारावीत आढळला दुसरा कोरोनाचा रूग्ण, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे . यातही महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. अशातच दाट लोकवस्ती असणाऱ्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली होती. मात्र ए. एन. आय या वृत्तसंस्थेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील धारावी येथे कामासाठी तैनात दुसरा असणारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हा रुग्ण बीएमसी स्वच्छता कर्मचारी असून त्यांचे वय ५२ वर्ष आहे. ते वरळी परिसरातील रहिवासी आहे, परंतु साफसफाईसाठी ते धारावी येथे तैनात होते. आता दोन रुग्ण धारावी येथील आढळल्यामुळे अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासन काम करीत आहे.

धारावीतील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

दरम्यान मुंबई आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी (दि.1) सायंकाळी धारावी येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयित रुग्णाची माहिती मिळाली. हा रुग्णाला ताब्यात घेण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाने पथक धारावी झोपडपट्टीत पाठवले. खबरदारीचा उपाय म्हणून आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याठिकाणी स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.

धारावीच्या परिसरात हजारो झोपडपट्ट्या आहेत. या ठिकाणी हा रुग्ण आढळून आला आहे. अशा परिस्थितीत या भागात संसर्ग पसरण्याचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेता अधिकाऱ्यांनमध्ये भीतीचे वातावरण आहे. हजारो झोपड्या असलेल्या धारावीत कोरोनाच रुग्ण आढळून आल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हजारो झोपड्या एकमेकांना चिटकून असल्याने या ठिकाणी कोरोना वेगाने पसरण्याची मोठी शक्यता आहे.

कुटुंबातील व्यक्ती क्वारंटाईनमध्ये

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, शाहू नगरमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. कोरोनाची लक्षण आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्या कुटुंबातील इतर सात जणांना देखील क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची गुरुवारी तपासणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा व्यक्ती ज्या इमारतीत रहात होता ती इमारत सील करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पुण्यात आणखी दोन नवे रुग्ण, राज्यातील आकडा ३३८

पुण्यात आज आणखी दोन नवीन कोरोना बाधित आढळून आले असून बुलढाण्यात एक जण नव्याने आढळला आहे. पुण्यात बुधवारी रात्रीपर्यंत ३९ कोरोनाबाधितांची संख्या होती. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३३८ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या ५४ झाली आहे. त्यापैकी १७ जण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. बुलढाण्यात आणखी एक कोरोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे बुलढाण्यातील कोरोना बाधितांची संख्या ५ वर गेली आहे. २८ मार्च रोजी मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या अत्यंत जवळच्या संपर्कातील ही व्यक्ती आहे.