अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी १ वर्ष सक्तमजूरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पायी जाणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा दुचाकीवरून येऊन विनयभंग केल्याप्रकऱणी एकाला १ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. राजेश राधेय वणवे (३२, वडगावशेरी), असे त्याचे नावे आहे. ही घटना २० जानेवारी २०१५ रोजी वडगावशेरी येथे घडली होती. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेच्या दिवशी पिडीत १४ वर्षीय मुलगी वडगावशेरी येथे रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी राजेश रावणे व सुजित सिंग हे दोघे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी तिच्या विनयभंग केला. असे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक लोखंडे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयीन प्रक्रियेपुर्वी सुजीत पिखारी सिंग याचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यातील राजेश रावणे याच्यावर दोषसिद्धी झाल्यानतंर त्याला १ वर्ष सक्त मजूरी व दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, पैरवी अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट कर्मचारी राजेश शेलार, सुधीर चिकणे यांनी यासंदर्भात प्रयत्न केले.