‘डिजे’ लावून गणपतीला निरोप देणाऱ्या ८० गणेश मंडळावर गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून ‘डिजे’च्या दणदणाट करत गणपती विसर्जन करणाऱ्या पोलिस आयुक्तालयातील तब्बल ८० गणेश मंडळांवर पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गुन्हे फक्त सहा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत, त्यामुळे बाकीच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘डीजे’ वाजलेच नाहीत का? असा प्रश्नचिन्ह उभा राहतो.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a74c6a47-c011-11e8-8362-bff66c4b95db’]

रविवारी शहरवासीयांनी मोठ्या भक्ती भावात गणेशाला निरोप दिला. यावेळी काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला, तर अनेक मंडळांचे कार्यकर्ते कर्णकर्षक आवाजाच्या ‘डिजे’च्या गाण्यांवर थिरकत होती. उच्च न्यायालयाचे आदेश झुगारून शहरात मोठया प्रमाणावर डिजे लावून मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र आठ पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही हा खरच संशोधनाचा भाग आहे.

शहरातील वाकड पोलिसांनी २३ गणेश मंडळांवर, पिंपरी पोलिसांनी १८, सांगवी पोलिसांनी १३, चाकण पोलिसांनी १२, भोसरी पोलिसांनी १० आणि हिंजवडी पोलिसांनी ४ मंडळांवर ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल केले आहेत. बाकी भोसरी एमआयडीसी, चिंचवड, निगडी, दिघी, आळंदी, देहूरोड, तळेगाव आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ad912e42-c011-11e8-abfa-19415d060533′]

दारु पिणाऱ्या ७१ जणांवर कारवाई
विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन आल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तालयात ७१ तळीरामावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी पोलिसांनी ३६, चिंचवड १, चाकण १३, वाकड दोन, सांगवी एक, देहूरोड १० आणि तळेगाव दाभाडे ८ जणांवर कारवाई केली असून बाकी पोलीस ठाण्यात एकही कारवाई झालेली नाही.

गुन्हे शाखेत दोन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या