तिहेरी तलाकचा पहिला FIR महाराष्ट्रातील मुंब्य्रात, ७ महिन्याच्या ‘प्रेग्‍नंट’ महिलेला ‘WhatsApp’वरून ‘तलाक’

मुंब्रा : पोलीसनामा ऑनलाइन – तिहेरी तलाकच्या विधेयकाला लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील मंजूरी मिळाली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील तिहेरी तलाक विधेयकाला मान्यता दिली. कायद्याच्या अंमलबजावणीला सुरवात झाली असून यासंदर्भातील पहिला-वहिला गुन्हा महाराष्ट्रामधील मुुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. तक्रारदार महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलसांनी तिच्या सासू, सासरा आणि पतीविरूध्द तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला ही 7 महिन्याची गदरोदर असून तिला तिच्या पतीने व्हॉट्सअ‍ॅपवरून तलाक…तलाक…तलाक असा मेसेज पाठवला होता. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत तिहेरी तलाकचं विधेयक मंजूर झाल्यानंतर बहुतांश महिलांनी अखेर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली होती. मुस्लिम महिलांमध्ये देखील मोठा आनंद पहावयास मिळाला होता. आता तर प्रत्यक्षात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा अंमलात आला आहे. त्यामुळे कोणत्याही मुस्लिम महिलेवर अन्याय होणार नाही अशी भावना व्यक्‍त करण्यात येत आहे. तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर समाजाच्या सर्वच स्तरातून मोदी सरकारचं कौतुक करण्यात आलं होतं. तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा महाराष्ट्रातील मुंब्रा येथे दाखल झाला आहे. तक्रारदार महिलेचं शिक्षण हे एमबीएपर्यंत झालेलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त