आता करू शकणार नाहीत एक दिवसात 10 हजारापेक्षा अधिक ‘कॅश’ पेमेंट, बदलला ‘हा’ नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही सुद्धा 10 हजारपेक्षा जास्त पेमेन्ट कॅशमध्ये करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने इन्कम टॅक्स कायदा 1962 मध्ये बदल केला आहे, ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीसाठी एका दिवसात कॅश पेमेन्टची मर्यादा कमी करण्यात आली आहे. इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 6 डीडीमध्ये बदल करण्यात आला आहे.

हा नियम कोणत्याही व्यक्तीने एका दिवसात किती कॅश पेमेन्ट करावे किंवा अकाउंट पे चेक अथवा बँक डाफ्टद्वारे 20 हजार रूपयांपेक्षा जास्त पेमेन्ट करण्याबाबत आहे. या नियमातील दुरूस्तीनंतर आता पेमेन्टची मर्यादा 10 हजार रूपये प्रती व्यक्ती झाली आहे. इन्कम टॅक्स कलम 6 डीडीमध्ये दुरूस्तीनुसार, कोणत्याही व्यक्तीला एका दिवसात कोणतीही बँक अथवा कोणत्याही कामासाठी 10,000 रूपयांपेक्षा जास्त कोणालाही एक दिवसात देता येतात.

किंवा कोणत्याही बँक खात्याच्या पेयी बँक ड्राफ्ट किंवा बँक क्लीयरन्सच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक क्लीयरिंग प्रणालीचा उपयोग करून खात्याच्या चेकद्वारे पेमेन्टची मर्यादा 10 हजार रुपये आहे. यापेक्षा जास्त पेमेन्ट इलेक्ट्रॉनिक मोडने करता येऊ शकते. जे 6एबीबीए अंतर्गत येते.