IRDAI ची मोठी घोषणा ! कोरोनावरील उपचारही होणार कॅशलेस, विमा कंपन्यांना दिले ‘हे’ आदेश

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाने हाहाकार केला आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढत आहे. अनेक रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. या सर्व परिस्थितीवर विमा नियामक, प्राधिकरणने कोव्हीड रुग्णांसाठी एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कोरोना रुग्ण अन्य आजारांप्रमाणे कॅशलेस उपचाराच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याबाबत IRDAI ने तशा गाईडलाईन जाहीर केल्या आहेत. या IRDAI ने विमा कंपन्याने ग्राहकांना नेटवर्क रुग्णालयात रुग्णाच्या उपचारासाठी कॅशलेस सेवां उपलब्ध करण्याचं म्हटलं आहे. IRDAI च्या निर्णयावरून केंद्र सरकारने स्वागत केले आहे.

असा मिळणार कोरोना रुग्णांना लाभ –
या नियमावलीनुसार ज्यांनी आरोग्य विमा केला आहे आणि त्या माध्यमातून कोरोनावर कॅशलेस उपचारही करू इच्छितात. अर्थात जर एखादे रुग्णालय एखाद्या रुग्णाला अन्य आजारांसाठी कॅशलेस ट्रिटमेंटची सुविधा देत असेल, तर त्या रुग्णालयाला आता कोरोनासाठीही कॅशलेस सुविधा द्यावी लागणार आहे.

ADV

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २२ एप्रिल रोजी IRDAI चे अध्यक्ष एस.सी. खुंटिया यांच्याशी चर्चा केली. यावेळी, विमा कंपन्यांच्या माध्यमातून कॅशलेस सुविधा न देण्याबाबत येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचं म्हटलं आहे. जर एखाद्या रुग्णाने तक्रार केली, तर त्या विमा म्हणजे इन्शुरन्स कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

विमा घेत असताना हे ध्यानात ठेवा –
विमा धोरण घेण्यापूर्वी हे समजून घेणे गरजेचे आहे, त्यामध्ये कोण-कोणते आजार कव्हर केले आहेत. यासाठी आरोग्य विमा योजनेची यादी तपासणे. याव्यतिरिक्त विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेश्यो तपासणे. यामुळे कंपनीने इलाजाच्या खर्चाचं आतापर्यंत किती लोकांचं पेमेंट केलं आहे, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.