Caste Validity Certificate | फर्ग्युसन महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा जात पडताळणी समितीच्यावतीने (Caste Validity Certificate) सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळण्यासाठी सुरु असलेल्या विशेष मोहीमेबाबत माहिती देण्यासाठी फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालय (Ferguson Junior College) येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) महत्वाचे असल्याने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेमधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे (Social Welfare Commissioner Dr. Prashant Narnaware) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये (BARTI Director General Dhammajyoti Gajbhiye) पुणे यांनी दिले आहेत. त्यानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यशाळेत जात वैधता प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र कार्यपद्धती विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असून विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरून मुळ प्रस्ताव जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

कार्यशाळेला जिल्हा जात पडताळणी समितीचे (District Caste Verification Committee)
सदस्य सचिव संतोष जाधव (Santosh Jadhav), प्रकल्प अधिकारी किर्ती शेलार (Kirti Shelar),
फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी (Fergusson Junior College Principal Dr. Nitin Kulkarni)आदी उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर प्राप्त व्हावेत यासाठी राबविण्यात येणाऱ्या
या मोहिमेअंतर्गंत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पॅटर्नच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात समतादूत,
गृहपाल यांच्यामार्फत प्रत्यक्ष महाविद्यालय, विद्यार्थी, पालक तसेच समान संधी केंद्रांच्या समन्वयातून विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

Web Title :- Caste Validity Certificate | Conducted Caste Validity Certificate Guidance Workshop at Fergusson College

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….

Amruta Fadnavis | ‘मी फक्त एकाच व्यक्तीला घाबरते, त्या म्हणजे…’ – अमृता फडणवीस

Neha Malik | नेहा मलिकचे हॉट फोटोशूट चांगलेच व्हायरल; नेहाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायळ..