रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह दोघे पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे राज्यासह देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड्स, इंजेक्शन, मिळण्यास लोकांना अडचण येत आहे.

अशातच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होताना दिसत आहे. येथील औरंगाबाद जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीत जिल्हा रुग्णालयातील कार्यरत जाणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखील आहेत. मंदार भालेराव (वय, २९, शिवाजीनगर), अभिजित नामदेव तौर व घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनिल ओमप्रकाश बोहते अशी या आरोपींची नावे आहेत.

अशा कोरोनाच्या परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक इंजेक्शन साठी धडपड करत असतानाच, त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत काहींनी रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु केला आहे. काळाबाजार करणाऱ्यांच्या बाबत पोलिसांना माहिती मिळाली याद्वारे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याऱ्या मंदार भालेराव रेमडेसिविरचे १ इंजेक्शन तब्बल १४ ते १५ हजारात विकत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारीसह घेत सापळा रचत. गुरुवारी संध्याकाळच्या दरम्यान या पथकाने मंदार यास इंजेक्शनसाठी फोन केला. त्याने सूतगिरणी चौकात बोलावून त्यांच्याकडून १५ हजार रुपये घेऊन ३ तासात इंजेक्शन सांगेल त्या ठिकाणी आणून देतो असे त्याने सांगितले.

याच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक जि. बी. सोनवणे, पोलीस हवालदार रमेश सांगळे आणि औषध निरीक्षक आर. एम. बजाज यांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी मंदार याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनिल बोहते याने ३ रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी दिल्याची त्याने माहिती दिलीय. यामध्ये अभिजित नामदेव तौर याचाही सहभाग असल्याची माहिती दिली. या सर्वाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ३ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.