CBI Raids In Mumbai-Pune | सीबीआयची मोठी कारवाई ! मुंबई-पुण्यातील 3 बड्या उद्योगपतींशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CBI Raids In Mumbai-Pune | मुंबई (Mumbai) आणि पुण्यातील (Pune) बड्या उद्योगपतींशी संबंधित ठिकाणांवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे (CBI Raids In Mumbai-Pune ). सकाळपासून सीबीआयने सुरू केलेली ही छापेमारी बँक घोटाळ्याच्या (Yes Bank Fraud Case) तपासाच्या अनुषंगाने असल्याचे सांगितलं जात आहे. या छापेमारीत बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale), शाहिद बलवा (Shahid Balwa) आणि विनोद गोयंका (Vinod Goenka) या उद्योजकांचा समावेश आहे.

 

 

 

पुण्यामध्ये अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (Avinash Bhosale Infrastructure Limited) परिसरात सीबीआयने छापेमारी (CBI Raids In Mumbai-Pune) केली आहे. तसेच, 2G घोटाळ्यात नाव आलेल्या शाहिद बलवा यांच्या कंपन्यांवर देखील धाड टाकली आहे. दरम्यान, सीबीआयने ज्या 3 उद्योगपतींच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत ते तीनही उद्योगपती राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) नजदीकचे मानले जातात. या पार्श्वभूमीवर राजकीय रंग देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, भोसले यांच्या मालमत्तांवरही सीबीआयने छापेमारी केली आहे. त्याचबरोबर मागील अनेक दिवसांपासून अविनाश भोसले हे ED च्या रडारवरही आहेत. काही महिन्यांपूर्वी फेमा कायद्याअंतर्गत कारवाई करत जवळपास 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

Web Title : CBI Raids In Mumbai-Pune | cbi searches at 8 locations
in mumbai and pune related to a yes bank fraud case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा