सावधान ! कांद्यामुळे पसरतोय ’या’ बॅक्टेरियाचा संसर्ग, ‘ही’ 5 आहेत लक्षणं, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – एका नवीन बॅक्टेरियाच्या संसर्गाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बॅक्टेरियाचे नाव सॅल्मोनेला आहे. अमेरिकेच्या 34 राज्यांमध्ये 400 लोकांना याचा संसर्ग झाला आहे. कॅनडात सुद्धा लोण पोहचले आहे. अमेरिकेच्या सीडीसीने याबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्या आहे.

काय सांगितले सीडीसीने

* घरात आधीपासूनच कांदे आहेत त्यांनी ते फेकून द्यावेत.

* सॅल्मोनेला बॅक्टेरियाचे मुळ लाल रंगाच्या कांद्यात आहे.

* 19 जून ते 11 जुलै यादरम्यान हे संक्रमण वाढत गेलं आहे.

* पुरवठादार संस्था थॉमसन इंटरनॅशनलकडून लाल, पांढरा, पिवळा आणि गोड कांदा परत मागवला आहे.

ही आहेत लक्षणं

1 अतिसार
2 पोटदुखी
3 ताप येणे
4 सहा तासांपासून सहा दिवसांपर्यंत लक्षणांची तीव्रता दिसू शकते.
5 गंभीर संक्रमण झाल्यास आतड्यांचे नुकसान होऊ शकते.