केंद्रानं युवाशक्तीच्या ‘बॉम्ब’ची वात पेटवू नये, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना ‘सल्ला’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात मागील काही दिवसांपासून अशांततेची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी नागरिकत्व संशोधन विधेयकाला आणि एनआरसीला विरोध करणारी आंदोलने होत आहेत. यावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले आहे. देशात आणि राज्यात अस्थिरतेचे, अशांततेचं वातावरण निर्माण होत आहे.

दिल्लीच्या विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांवर गोळीबार केला, जालियनवाला बाग हत्याकांडासारखं वातावरण देशात निर्माण केलं जातंय का याची शंका उपस्थित होते. संपूर्ण जगात भारत सर्वाधिक जास्त तरुण असलेला देश असणार आहे. त्यामुळे ही युवाशक्ती आहे, बॉम्ब आहे याची वात पेटवण्याचा प्रयत्न करु नये.

आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की ज्या देशातील युवक बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. युवक हे आपल्या देशाची शक्ती आहे. भविष्यातील आधारस्तंभ आहे. युवकांना बिथरवू नका असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या बाबत विरोधी पक्षांकडून ज्या प्रकारे सरकारवर टीका करण्यात येत आहे त्याला देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की येथं शेतकऱ्यांसाठी गळा काढण्यापेक्षा केंद्राकडे गळा काढा. केंद्रात विरोधी पक्षांचे सरकार आहे. केंद्रातून राज्याला मिळणारा जीएसटीचा परतावा जवळपास 15 हजार कोटी रुपये आहे. केंद्राकेड चार पाच राज्यांनी मागणी केल्यावर आता केंद्राने पहिला हफ्ता साडेचार हजार कोटी रुपये दिला आहे. शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावे करा, राज्य सरकारच्या नावे करु नका.

या दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की प्रश्न मांडायचे असतील तर ही पद्धत नाही. बोंबलून प्रश्न मांडता येत नाहीत. सरकार बदलल्यानंतर जनतेच्या मनात आनंद आहे. आशा पल्लवित झाल्या आहेत. त्या खुरडण्याचा प्रयत्न करु नका. मुख्यमंत्री म्हणून जनतेला न्याय देण्याचे काम मी करत आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या जामिया मिलिया इस्लमिया विद्यापीठाच्या परिसरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. परंतु अटक केलेल्या व्यक्तीमधील एकही विद्यार्थी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर यातील 3 जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/