मॉब लिंचिंग प्रकरणात केंद्राचा राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचा अफवांवरून निर्दोष लोकांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडत आहेत . महाराष्ट्रात तर या प्रकरणामुळे पाच जणांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आता केंद्र सरकारने याबाबत पाऊल उचलले आहे. या घटनांची केंद्र सरकारने गंभीर दाखल घेतली असून मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आणि योग्य त्या करण्याचे आदेशच केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत.
[amazon_link asins=’B071L8JTL4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b377dda6-8056-11e8-a7de-67c6f85f64b3′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारने ज्या ज्या भागात मुलं चोरी होण्याच्या अफवा पसरल्या आहेत, अशा सर्व ठिकाणांची माहिती काढण्याचे  जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्या आणि नंतर लोकांमध्ये जाऊन गैरसमज दूर करा असे बजावले आहे. याबरोबरच  प्रकारणे गंभीरपणे घेऊन त्यावर लगेच  आदेश गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहे.

सोशल मीडियावरून अफवा पसरविल्या जात असल्याने केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपलाही काही सूचना केल्या होत्या. बेजबाबदार आणि स्फोटक मेसेज पाठवने  थांबवा, अशा सूचना देतानाच अशा प्रकारच्या मेसेजबाबत व्हॉट्सअॅपला उत्तर द्यावेच लागेल, असंही केंद्राने म्हटले  होते . त्यानंतर व्हॉट्सअॅपनेही अशा प्रकारच्या मेसेजमुळे चिंतीत असल्याचे  म्हटले  होते . याबाबत सरकार, समाज आणि टेक्नोलॉजी कंपनीने एकत्र मिळून काम करण्याची गरज असल्याचे ही व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.