Pune News : केंद्र व राज्य सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही, प्रकाश आंबेडकर यांची टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र आणि राज्य सरकारकडे (central and state governments ) अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. जर त्यांच्याकडे ती असती तर किंबहुना कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर (Economic crisis) मात करण्यात नक्कीच यश आले असते. नागरिक कोणता निर्णय घ्यावा, यासंबंधात बोलतात. परंतु सरकार काही केल्या निर्णय घेण्यास तयार नाही. ते फक्त दुर्दैवाने आदेश काढत आहेत, अशी टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर (Dr. Prakash Ambedkar) यांनी केली आहे.

कोरेगाव भीमा येथे प्रकाश आंबेडकर विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आतापर्यंत पुणे, मुंबईसाठी महत्त्वाची असलेली लोकल सुरु झाली पाहिजे होती. मात्र, दुर्दैवाने सरकार याविषयी कोणतीही ठोस भूमिका घेत निर्णय घेण्याची क्षमता दाखवत नाही. कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असे मला वाटत नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अनुयायांनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी 1 जानेवारी या देशातील समाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचं आम्ही मानतो, असे सांगितले.