Covid-19 पॉझिटिव्ह रुग्णांनाही मतदान करता येणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन : पुणे विभागात पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी (Graduate Constituency, Teacher Constituency) येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. परंतु, कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (central-election-commissions) स्वतंत्र मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये कोविड संशयित, होम क्वारंटाईन, हाॅस्पिटलमध्ये अँडमिट असलेल्या व 65 वर्षांवरील सर्व मतदारांसाठी पोस्टल मतदान करण्याची सुविधा दिली आहे. एवढेच नाही तर मतदानच्या एक-दोन दिवस आगोदर पाॅझिटिव्ह आलेल्या मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी शेवटचा एक तास खास कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी (corona-positive-voters-will-be-able-vote) देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघासह पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कोरोनानंतर राज्यात प्रथमच ही जाहीर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाकडून विविध मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात मतदान केंद्रातील कर्मचा-यांना पीपीए किटपासून, सॅनिटायजर, हॅन्ड ग्लोज सर्व साहित्य व सुविधा दिल्या जाणार आहेत. याशिवाय मतदान केंद्रांची संख्या 1200 वरून 500 ते 700 करणे, मतदान केंद्राच्या बाहेर थर्मल गनद्वारे तपासणी करणे, सॅनिटायजर करणे आदी विविध प्रकारची खबरदार घेण्यात येणार आहे.

– विभागातील मतदार
पदवीधर मतदार संघ : 5 लाख 25 हजार 856
शिक्षक मतदार संघ : 1 लाख 18 हजार 556