CET Exam | 11 वी प्रवेशासाठीची CET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना शुल्क परत करणार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CET Exam | राज्यात 11 वी प्रवेशासाठी (FYJC Admission) होणारी सीईटी अर्थात सामाईक प्रवेश परीक्षा रद्द (CET Exam) करण्यात आली आहे. परीक्षेसाठी भरण्यात आलेल्या शुल्कातून (Exam Fee) 20 टक्के प्रक्रिया शुल्क (Processing Fee) म्हणून कपात करुन उर्वरीत रक्कम विद्याथ्यांच्या खात्यावर ऑनलाइन (Online) भरली जाणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक महेश पालकर (Director of Secondary and Higher Secondary Education Mahesh Palkar) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यात 11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) लागू करण्यात आली होती. मात्र आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सीईटी प्रवेश परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 178 रुपये शुक्ल घेण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार जमा शुल्कापैकी 20 टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून कपात करुन उर्वरीत रक्कम विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे. 20 टक्के प्रमाणे 35 रुपये कपात करुन उर्वरीत 143 रुपये विद्यार्थ्यांना परत केले जाणार आहेत.
दुबार शुल्क जमा केलेल्या विद्यार्थ्यांना त्याची दुबार शुल्क रक्कम पूर्णपणे परत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी ज्या बँक खात्यातून ही रक्कम जमा केली होती. त्याच बँक खात्यामध्ये 20 टक्के कपात करुन उर्वरीत रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा केली जाणार आहे.
Web Title :- CET Exam | CET exam for 11th admission canceled fees will be refunded to students
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update