सराईत चेन स्नॅचर पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चोरट्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका महिलेची सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली होती. पोलिसांनी २४ तासात या गुन्ह्यातील आरोपींनी गजाआड करुन मुद्देमाल जप्त केला.
किशोर शकर मोरे (वय-३२ रा. डायस्पॉट, गुलटेकडी, पुणे), आकाश गोविंद गायकवाड (वय-२५ रा. साईबाबा मंदीरासमोर, पर्वती दर्शन, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
कात्रज येथील शेलारमळा येथे धनश्री सुनिल गोसावी (वय-४०) या घराजवळील बेलाच्या झाडाची पाने तोडत असताना आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली. चोरटे कात्रज तलावाच्या दिशेने पाढऱ्या रंगाच्या मोपेडवरुन पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांन परिसरातील ४१ सीसीटीव्ही तपासले. तसेच पांढऱ्या रंगाच्या १२६ मोपेड वाहनांची माहिती घेतली. दरम्यान, आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विनोद भंडलकर व प्रणव संकपाळ यांना हा गुन्हा किशोर मोरे आणि आकाश गायकवाड यांनी केला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर दत्तवाडी, सहकारनगर, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यात १५ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात वापरलेली मोपेड आणि २० ग्रॅम वजानाची सोनसाखळी असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे साहयक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड, सहायक पोलीस फौजदार प्रदीप गुरव, पोलीस हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, प्रणव संकपाळ, उज्ज्वल मोकाशी, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडेकर यांच्या पथकाने केली.
जाहिरात