chain snatching in pune | ‘वटपौर्णिमेला’ चोरटयांनी साजरी केली ‘दिवाळी’, विश्रांतवाडी अन् सासवड रोडवर महिलांच्या गळयातील दागिने लांबबिले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – chain snatching in pune | दरवर्षीप्रमाणे यंदाही चोरट्यांनी महिलांसोबतच स्वतःची “वटपौर्णिमा” साजरी केली आणि दागिने घालून आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिन्यावर डल्ला मारला आहे. विश्रांतवाडी व सासवड रस्त्यावर या घटना घडल्या असून, यात पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासवड रस्त्यावरील देवाची ऊरळी गावात राहायला आहेत. गुरूवारी (24 जून) दुपारी बाराच्या सुमारास वडपूजेला आल्या होत्या. पूजन झाल्यानंतर त्या पायी जात होत्या. हडपसर-सासवड रस्त्यावर सावली होम्स सोसायटीजवळ त्या आल्या असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व राणीहार असा 75 हजारांचा ऐवज हिसकावून नेला. त्यांनी आरडाओरडा केला. पण, चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. अधिक तपास उपनिरीक्षक पी. के. हंबीर करत आहेत.

तर दुसरी घटना विश्रांतवाड भागात घडली आहे. याबाबत 48 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
त्यानुसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी या धानोरी
परिसरात नातेवाईकांबरोबर दुपारी सव्वाचारच्या सुमारास वडपूजन करून घरी निघाल्या होत्या.
त्यावेळी दुचाकीवरील आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक
तपास उपनिरीक्षक लहू सातपुते करत आहेत.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price । पेट्रोलचा दर 125 रुपये होणार? इंधन दरवाढीवर तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

43 वेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळला व्यक्ती, त्रस्त होऊन पत्नीला म्हणाला – ‘आता मरू दे’

Delta Plus Variant | डेल्टा प्लसचे पेशंट वाढल्याने राज्यात लॉकडाऊन? आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : chain snatching in pune | incident happen in vishrantwadi and saswad road area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update