Chakan Murder Case | चाकणमध्ये अल्पवयीन मित्राचा खून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; दोन अल्पवयीन ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Chakan Murder Case | पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) हद्दीतील चाकण येथे एका अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. खून करुन आरोपीने घटनेचा व्हिडिओ तयार करुन इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले असून व्हिडिओ सोशल मीडियातून डिलीट केला आहे. ही घटना चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये सोमवारच्या रात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अलपवयीन मुले सोमवारी रात्री मद्यापान करण्यासाठी बसले होते. त्यापैकी दोनजण सराईत गुन्हेगार होते. दरम्यान त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होऊन वाद सुरु झाला. खून झालेल्या मुलाने आरोपीच्या कानाखाली मारली. यामुळे वाद आणखीनच पेटला. त्यावेळी सराईत आरोपीने दुसऱ्या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून खून केला. तर त्याच्या सहकाऱ्याने खून करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला. मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर खून करणाऱ्यापैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. चाकण पोलिसांनी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतले आहे.

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय आहे?

मुख्य आरोपीच्या साथीदाराने खून करताना व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला.
मीच त्याची हत्या केली असं म्हणत तो व्हिडिओ काढायला सांगतो.
तसेच मुख्य आरोपी मृत मुलाच्या डोक्यात दगड घालताना दिसत आहे.
मुख्य आरोपीने तो व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टेटस वर ठेवला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या आधारे चाकण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका