SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – SIT Investigate Manoj Jarange Movement | अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत मराठा आंदोलनाचे (Maratha Reservation Andolan) नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर सरकारने मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे यांच्यावरील कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. काल जरांगे यांच्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केल्यानंतर आज भाजपा आमदारांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीची मागणी सभागृहात केली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली असून तसे आदेश दिले आहेत.(SIT Investigate Manoj Jarange Movement)

आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीचा मुद्दा सभागृहात मांडला. यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला.

आशिष शेलार यांनी म्हटले की, महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जात आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार? अशी भाषा कोणी करत असेल तर त्या भूमिकेविरोधात विरोधक उभे राहतील, असा आमचा विश्वास आहे.

अशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्र बेचिराख करण्याची केवळ धमकी आहे का? काही वेगळी भूमिका आहे? त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का? याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण, आता मराठा समाजाची बदनामी होत आहे.

आशिष शेलार म्हणाले, उप मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरला, ऐकेरी उल्लेख केला. मानसन्मानाच्या बाबतीत फडणवीसांनी कधी ब्र काढला नाही. कायदा सुव्यवस्था, राज्य सरकार आणि भारताविरोधात फडणवीस कधी बोलत नाही. पण तरीही उपमुख्यमंत्र्यांना निपटून टाकण्याची भाषा केली जाते. एका मंत्र्यापासून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचले. हे काय चालले आहे.

आशिष शेलार म्हणाले, हा घटनाक्रम सरळ नाही. देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी यांच्या पक्षाचे
प्रवक्ते पोपटलाल बोलले. सकाळी ९ वाजता भाजपाला एका दिवसात संपवू असे म्हणाले.
आणि दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली. हे कटकारस्थान आहे.

आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्रात पंतप्रधानांची सभा उधळून टाकू, असे म्हटले जात आहे. हे कटकारस्थान आहे.
याची गंभीर नोंद घेतली पाहिजे. आज या व्यक्तीला महत्त्व द्यायचे नाही. समाज आमच्याबरोबर आहे.
हे सगळे घडवणारे मनोज जरांगे राहतात कुठे हे शोधले पाहिजे. तो कारखाना कोणाचा आहे हे शोधले पाहिजे.
तिथे आलेले दगडे कोणाच्या कारखान्यातील आहेत हे शोधले पाहिजे.

या आंदोलनाला जेसीबी ट्रॅक्टर कोणाच्या कारखानातून आले. या सगळ्यामागे एका व्यक्तीच्या समर्थनाची,
पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, एका कारखान्याच्या मालकाची असेल तर एसआयटी लावा, अशी मागणी शेलार यांनी केली.

आशिष शेलार यांनी एसआयटी चौकशीची मागणी केल्यानंतर विरोधीपक्षाकडून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बाजू मांडत सत्ताधाऱ्यांना जोरदार फटकारले. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला.

या दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काहीकाळ कामकाज तहकूब केले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आणि तसे आदेश दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

Pune Pimpri Crime | पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना