Chalapathi Rao | ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Chalapathi Rao | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचे 25 डिसेंबर रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने साउथ सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. (Chalapathi Rao)

 

चलपती राव यांनी आजवर 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना कॉमेडी आणि खलनायक भूमिकेसाठी जास्त ओळखले जाते. अनेक दिवसांपासून त्यांच्या आरोग्याच्या समस्यांशी ते झुंजत होते. त्यामुळे ते बराच काळ पडद्यापासून दूर होते. त्यांनी आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले. तर त्यांच्या या अशा अचानक जाण्याने चाहते सुद्धा दुःख व्यक्त करत आहेत. (Chalapathi Rao)

तर सोशल मीडियावर अनेक कलाकार मित्र मंडळी परिवार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आंध्र प्रदेशात जन्मलेला चलपतीने इंडस्ट्रीला ‘साक्षी’, ‘ड्रायव्हर रामुडू’ आणि ‘वजराम’ सारखे हिट चित्रपट दिले. याशिवाय ते सलमान खानच्या ‘किक’ या चित्रपटातही दिसले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी इंदुमती आणि तीन मुले असा परिवार आहे. त्यापैकी एक मुलगा अभिनेता चित्रपट निर्माता म्हणून देखील ओळखला जातो.

 

Web Title :- Chalapathi Rao | famous south actor chalapathi rao passed away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला आता त्यांच्याच मुलाला आणि नातवाला…’; शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र