Chandigarh Girls Hostel MMS | चंदीगड यूनिव्हर्सिटीच्या 60 विद्यार्थीनींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ झाला लीक, सत्य समोर येताच गर्ल्स हॉस्टेलमधील आरोपी विद्यार्थीनीला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Chandigarh Girls Hostel MMS | पंजाबमधील मोहाली येथे असलेल्या चंदीगड विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीने 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला आणि तो एका तरुणाला पाठवला. तरुणाने तो व्हायरल केला. मात्र, याप्रकरणात पोलिस वेगळेच सांगत आहेत. (Chandigarh Girls Hostel MMS)

 

मोहाली येथील चंदिगड विद्यापीठात दुपारी अडीच वाजता गोंधळ उडाला. मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून एका तरुणाला पाठवला. तरुणाने हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल केला. मात्र, पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी विद्यार्थीनीने एकच व्हिडिओ बनवला आहे.

 

हा प्रकार समजल्यानंतर वसतिगृहात राहणार्‍या आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी आत्महत्येचा प्रकार नाकारला आहे. याप्रकरणी आरोपी विद्यार्थीनीला ताब्यात घेण्यात आले आहे. दुसरीकडे, चंदीगड विद्यापीठाच्या डीपीआरओने कोणत्याही विद्यार्थीनीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला नाही असे म्हटले आहे. एसएसपींनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

या घटनेची माहिती देताना एसएसपी मोहाली यांनी सांगितले की, हे प्रकरण एका विद्यार्थीनीने इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ शूट केल्याचे आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपी विद्यार्थीनीला अटक करण्यात आली आहे. या घटनेशी संबंधित कोणत्याही मृत्यूचे वृत्त नाही. कोणीही आत्महत्या केल्याची नोंद नाही. एक विद्यार्थिनी तणावात होती तिला रुग्णवाहिकेने नेण्यात आले होते.

एसएसपी विवेकशील सोनी यांनी म्हटले की, आतापर्यंतच्या तपासात आम्हाला समजले आहे की, आरोपीकडे फक्त एकच व्हिडिओ आहे. त्याने इतर कोणाचाही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही. विद्यार्थीनीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाईल फोन जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.

 

असे सांगितले जात आहे की, विद्यार्थीनी बरेच दिवसांपासून विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ बनवत होती आणि ते शिमल्यातील एका तरुणाला पाठवत होती. तरुणाने हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर टाकला. विद्यार्थिनींनी जेव्हा त्यांचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर पाहिल्या तेव्हा त्यांना धक्का बसला.

 

प्रकरण दडपण्यासाठी विद्यार्थीनींवर दबाव
हा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
या विद्यार्थिनींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याचवेळी चंदिगड विद्यापीठ व्यवस्थापन हे प्रकरण दाबण्यासाठी विद्यार्थीनींवर दबाव आणत आहे.
याबाबत कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही कॉलेज व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.

 

संतप्त विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री उशिरा चंदीगड विद्यापीठाला घेराव घातला आणि घोषणाबाजी केली.
असे सांगण्यात येत आहे की, व्हिडीओ बनवणार्‍या मुलीला हॉस्टेलच्या एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले आहे,
जेणेकरून तिच्यावर हल्ला होऊ नये.

 

हा गोंधळ इतका वाढला की सुरक्षा रक्षकाने मुख्य गेट बंद केले, तसेच पोलीस दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
संतप्त विद्यार्थ्यांनी पीसीआर वाहनेही उलटवली आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला.
प्रकरण मोठे असल्याने पोलिस प्रशासनही काहीच बोलत नाही. (Chandigarh Girls Hostel MMS)

याबाबत व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, मात्र व्यवस्थापनाने मौन बाळगल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.
या प्रकरणाबाबत कुणालाही काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला.
काल रात्री विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.

 

केजरीवाल म्हणाले – कठोर शिक्षा देऊ
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
दोषींना कठोर शिक्षा होईल, असे सांगितले. त्यांनी पीडित विद्यार्थिनींना धीर धरण्यास सांगितले.

 

Web Title :- Chandigarh Girls Hostel MMS | chandigarh uproar in girls hostel of private university in mohali 8 attempted suicide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dussehra Melava | दसरा मेळाव्यावरुन शिंदे-ठाकरे गटात चढाओढ असताना ठाकरे गटाला मोठा धक्का, शिंदे गटाला BKC मैदानाची परवानगी

Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना