Dussehra Melava | दसरा मेळाव्यावरुन शिंदे-ठाकरे गटात चढाओढ असताना ठाकरे गटाला मोठा धक्का, शिंदे गटाला BKC मैदानाची परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दसरा मेळाव्यावरुन (Dussehra Melava) उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) यांच्या रस्सीखेच सुरु असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर (BKC MMRDA Ground) मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्विकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून (Shivsena) दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात (Dussehra Melava) आला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

शिवसेनेच्या कामगार सेनेकडून बीकेसीतील कॅनरा बँकेजवळच्या (Canara Bank) मैदानासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, एका कंपनीकडून आधीच कार्यक्रमासाठी मैदान आरक्षित केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. बीकेसीमध्ये दोन मैदान आहेत. यातील एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाने अर्ज दाखल केला होता.

 

प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमांतर्गत एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेकडून बीकेसीतील दुसऱ्या मैदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण ते मैदान आधीच एका कंपनीकडून कार्याक्रमासाठी आरक्षित करण्यात आल्याने ठाकरे गटाची परवानगी नाकारण्यात आली आहे.

…तर शिवतीर्थावर आम्हाला परवानगी द्या
बीकेसीतील मैदानासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य हाच निकष असेल तर शिवतीर्थावर (Shivtirtha)
दसरा मेळावा (Dussehra Melava) घेण्यासाठी आम्हालाच परवानगी मिळाली पाहिजे.
कारण शिवसेनेनं पहिला अर्ज दाखल केला आहे,
असा दावा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी केला आहे.
आमचा गट वगैरे काही नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि एमएमआरडीएवर शिंदे गटाला परवानगी देण्यात आलेचे मला समजले.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या निकषानुसार त्यांना परवानगी दिली असेल तर शिवतीर्थावर आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे.
कारण पहिला अर्ज आम्ही दाखल केला आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची एक परंपरा आहे.
त्यामुळे मोर्चेबंधणी करण्याची आम्हाला गरज नसल्याचे सावंत यांनी म्हटले.

 

Web Title :- Dussehra Melava | CM eknath shinde group meeting to be held at bkc ground uddhav thackeray application rejected

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | …शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देताना यावर्षीच दिरंगाई का? सुनिल प्रभूंनी केले हे वक्तव्य

 

Pune Crime | मोठ्या भावानेच केला लहान भावाचा गळा दाबून खून, पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना

 

Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना