Chandigarh University MMS Scandal | विद्यार्थीनींचा बाथरुममध्ये चोरून व्हिडीओ काढण्याचा धक्कादायक प्रकार चंदीगढनंतर आता IIT Mumbai त उघड! कर्मचार्‍याचा उद्योग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandigarh University MMS Scandal | चंदीगढ पाठोपाठ आता आयआयटी मुंबई कॉलेजमध्ये विद्यार्थीनींचा बाथरुममध्ये चोरून अश्लील व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंदीगढमध्ये एका खासगी विद्यापीठातील 60 हून अधिक विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ एका विद्यार्थीनीने काढून एका तरुणाला पाठवला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकार उघडकीस आल्याने देशभरात खळबळ उडाली होती. आता मुंबई आयआयटीमध्येही (IIT Mumbai) असाच प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (Chandigarh University MMS Scandal)

 

या प्रकरणी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीने पवई पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थीनीने तक्रारीत म्हटले आहे की, कॅन्टीनच्या कर्मचार्‍याने रविवारी रात्री लेडीज हॉस्टेलच्या 10 (एच10) बाथरुमच्या खिडकीतून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. पवई पोलिसांनी एफआयआर दाखल करून 22 वर्षीय कॅन्टीन कर्मचार्‍याला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अद्याप तसा कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही. बुधवारी या आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल. (Chandigarh University MMS Scandal)

 

आयआयटी प्रशासनाने म्हटले की, आरोपीने विद्यार्थीनीच्या बाथरुममध्ये डोकावण्यासाठी ज्या पाईपचा वापर केला होता तो पाईप बंद करण्यात आला आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलू. आयआयटी मुंबईचे डीन प्रो. तपनेंदु कुंडू म्हणाले, हॉस्टेलचे कॅन्टीन पुरुष कर्मचारीच चालवित होते. बाहेरच्या भागातून बाथरुमपर्यंत पोहोचण्याची वाट सील करण्यात आली आहे. यानंतर विंग एच 10 ची पाहणी करून गरजेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईटची सोय केली आहे.

 

हे प्रकरण समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे.
आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅन्टीनचा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत होता.
त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कॅन्टीन तात्काळ बंद करण्यात आले असून, महिला कर्मचारी असतील तरच ते सुरू करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Chandigarh University MMS Scandal | iit mumbai after chandigarh mms leak the canteen employee was secretly recording the video of the ladies student in the bathroom

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune-Purandar Airport | पुरंदर विमानतळाचे भूसंपादन एमआयडीसी कायद्यानुसार (MIDC Act)

Male Fertility | ‘हे’ 4 फूड्स खाल्ल्याने वाढेल Sperm Count, पूर्ण होईल पिता बनण्याची इच्छा

Pune News | काय सांगता ! होय, पुण्यातील 13 हजार 464 सोसायट्यांची जागा अद्यापही बिल्डरच्या नावावर; जाणून घ्या नेमकं?