Chandiwal Commission | परमबीर सिंगांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदिवाल आयोगाला मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Ex-CP) परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गंभीर आरोप (Allegations) केले. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी (Inquiry) करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) चांदिवाल आयोगाची (Chandiwal Commission) स्थापना केली. न्या. कैलाश चांदीवाल (Justice Kailash Chandiwal) यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्या ही समिती चौकशी करत असून या चौकशी आयोगाला (Chandiwal Commission) एक महिन्याची मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे.

 

चांदिवाल आयोगाची (Chandiwal Commission) मुदत येत्या 31 मार्च रोजी संपणार होती. आता राज्य सरकारने आयोगाला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यावर खंडणी (Ransom) वसुलीचे आरोप केले होते. देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची खंडणी बार मालकांकडून वसूल (Recovery) करण्यास सांगितले असल्याची माहिती पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी आपल्याला दिली होती, असे सिंग यांनी पत्रात म्हटले होते.

 

आपल्याला या पत्रातील आरोपांच्या समर्थनार्थ काहीही सांगायचे नाही असे परमबीर सिंग यांनी आयोगासमोर नंतर सांगितले होते. सचिन वाझे यांना पुढे सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तसेच अनिल देशमुख हे देखील सध्या तुरुंगात आहेत.

चांदीवाल आयोगाची स्थापना 31 मार्च 2021 रोजी करण्यात आली होती.
त्यानंतर आयोगाला 31 मार्च 2022 पर्यंत मुतदवाढ देण्यात आली.
आता आणखी एक महिन्याची मुदतवाढ आयोगाला देण्यासंबंधीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी काढला.
चौकशीचे कामकाज अद्याप पूर्ण झाले नसल्याने आयोगाने सरकारकडे ही मुदतवाढ मागितली होती.

 

Web Title :- Chandiwal Commission | chandiwal commission get one month extension to probe parambir singh allegations on anil anil deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘…म्हणून भावना गवळी शिवसेनेच्या संपर्क अभियानाला गैरहजर’ – संजय राऊत

 

Ileana D’cruz Wear Transparent Bikini | पारदर्शक ब्रालेट घालून समुद्र किनारी झोपली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून चाहते झाले थक्क

 

Pune Crime | पुण्यात बेकायदेशीर गावठी दारुची विक्री करणारा गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आतापर्यंत 61 जणांवर कारवाई

 

Solapur Police | मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ सोलापूरात ? पोलिसांचे वसुलीचे टार्गेट स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाल्याचा RTI कार्यकर्त्याचा दावा; पोलिसांनी आरोप फेटाळले (व्हिडिओ)