Pune Crime | पुण्यात बेकायदेशीर गावठी दारुची विक्री करणारा गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आतापर्यंत 61 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारुची (Liquor) विक्री करणाऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 61 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

चंद्रकांत उर्फ चंदर बासु चव्हाण Chandrakant alias Chander Basu Chavan (वय-49 रा. बालाजी निवास, के.के. मार्केट गेट नं.1, नाल्याजवळ, बालाजीनगर, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. चंद्रकांत उर्फ चंदर चव्हाण याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Jail) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

चंद्रकांत उर्फ चंदर चव्हाण हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदारांच्या मदतीने बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारुची विक्री करत होता. याप्रकरणी त्याच्यावर 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील लोकांच्या आरोग्यास, जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. तसेच या भागात त्याची दहशत असल्याने नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नाहीत.

 

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चंद्रकांत उर्फ चंदर चव्हाण याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai), पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 61 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे.
त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta has so far taken action against 61 persons under MPDA Act

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | ‘या’ शेअरने एका वर्षात दिला 600% रिटर्न, आता ‘स्टॉक स्प्लिट’ करणार कंपनी

 

Deepika Padukone Viral News | दीपिका पादुकोनवर चाहते झाले नाराज, तिनं चक्क सोशल मीडियाला दाखवलं ‘Middle Finger’..

 

Sanjay Raut | अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठ विधान; म्हणाले – ‘शरद पवार दबावात नव्हते’