Chandra Grahan 2020 : आज 2020 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, वृषभ राशीवाल्यांनी घ्यावी खबरदारी

Chandra Grahan 2020 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज (30 नोव्हेंबर 2020, सोमवार) कार्तिक पोर्णिमेला होत आहे. हे ग्रहण भारतासह अनेक देशांमधून दिसणार आहे. ग्रहण दुपारी 1:04 वाजता सुरू होईल आणि सांयकाळी 5:22 वाजता समाप्त होईल. तज्ज्ञांनुसार, हे एक उपछाया ग्रहण आहे. भारतात या ग्राहणाचा परिणाम काही खास असणार नाही.

आजचे चंद्रग्रहण वृषभ राशीत आणि रोहणी नक्षत्रात होत आहे, ज्याचा परिणाम ज्योतिष शास्त्रानुसार सर्व राशींच्या व्यक्तीवर होईल. मात्र, हे उपछाया ग्रहण असल्याने याचा सूतक काळ असणार नाही.

व्यक्तीच्या जीवनात चंद्राचा वाईट परिणाम होतो तेव्हा तो विविध अडचणीतून जात असतो. मात्र, यास घाबरण्याचे कारण नाही. चंद्राच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी आपल्या आईची सेवा करा आणि त्यांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.

वृषभ राशीवाल्यांनी घ्यावी खबरदारी
वृषभ राशीच्या जातकांसाठी ग्रहण काळात काही दिवस पुढे थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. या काळीत खासकरून आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

चंद्रग्रहण तिथी आणि वेळ
प्रारंभ : 30 नोव्हेंबर 2020 च्या दुपारी 1:04 वाजता.
मध्यकाळ : दुपारी 3:13 वाजता.
समाप्ती : सायंकाळी 5:22 वाजता.