Chandrakant Khaire | ‘आम्ही शिवसैनिक, आमची अक्कल गुडघ्यात असते, काहीही करु शकतो’, नवनीत राणांबद्दल बोलताना चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्याचा अट्टाहास करुन राणा दाम्पत्य मुंबई आले होते. मात्र शिवसैनिकांनी विरोध केल्याने मोठा संघर्ष पहायला मिळाला होता. या संपूर्ण घडामोडीनंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर 13 दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. दरम्यान प्रकृती बिघडल्याने नवनीत राणा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. त्यांच्या टिकेबाबत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची जीभ घसरली. नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडले.

 

मला त्या बाईचा…
नवनीत राणा यांच्यावर टीका करताना चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले, नवनीत राणांबद्दल मी काहीही बोलणार नाही. मला त्या बाईचा राग आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ती बाई काहीही बोलते आहे. ती बाई कशी आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते, गुडघ्यामध्ये आमची अक्कल असते. आम्ही जाऊन काहीही करु शकतो, असे म्हणत खेरे यांनी राणा यांच्यावर खरमरीत टीका केली. ते बीडमध्ये बोलत होते.

पक्ष बदलणारी बाई
खैरे पुढे म्हणाले, नवनीत राणा यांच्याबद्दल मी काही बोलतच नाही. मी काही बोललो तर ते व्हायरल होईल.
कारण त्या बाईचा मला राग आलेला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत काहीही बोलते. तो रवी राणा देखील.
आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते किंवा गुडघ्यात अक्कल असते.
आम्ही जाऊन काहीतरी करु शकतो. कारण आम्हाला ते सहन होत नाही. आमचे ते दैवेत आहेत, प्रमुख आहेत.
काहीही बोलायचं, कोण सहन करेल? ती बाय काय होती, माहिती आहे ना सगंळं.
जातीचं खोट प्रमाणपत्र (False Caste Certificate) आणून निवडणूक (Election) लवढवली.
पूर्वी राष्ट्रवादीने (NCP) पाठिंबा दिला होता. आता भाजपने (BJP) पाठिंबा दिला आहे.
पक्ष बदलणारी बाई आहे, असा घणाघात त्यांनी केला.

 

Web Title :- Chandrakant Khaire | shivsena leader chandrakant khaire slams mp navneet rana in beed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? ‘हे’ 8 पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा, होईल फायदा, जाणून घ्या

 

Vicky Kaushal Instagram Post | विक्की कौशलच्या ‘मदर्स डे’ पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, पोस्ट पाहून नेटकरी झाले भावूक..

 

Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!

 

Urfi Javed Crush Name | ‘या’ अभिनेत्यानं चोरलं उर्फी जावेदचं हृदय, दुप्पट वयाच्या कलाकाराचं नाव घेत ती म्हणाली – ‘मला तो खूप आवडतो..’