Chandrakant Patil | ॲबॅकस प्रशिक्षण म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीच: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुण्यातील प्रतिष्ठेच्या एसआयपी ॲबॅकस रिजनल प्रॉडिजी २०२३ ला प्रचंड प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | एसआयपी ॲकॅडमी (SIP Academy Pune) ही ॲबॅकस प्रशिक्षण देऊन वास्तवात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीच करत आहे. या वयातील विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाचे विषय शिकण्यापेक्षा दीर्घकालीन कौशल्ये शिकली पाहिजेत. एसआयपी ॲकॅडमीमधील विद्यार्थी हेच करत आहेत, अशा शब्दांत पुणे जिल्हा पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या प्रशिक्षणाचे कौतुक केले.

एसआयपी ॲबॅकसने नुकतेच प्रादेशिक पातळीवरील एसआयपी ॲबॅकस रिजनल प्रॉडिजी २०२३ चे आयोजन केले होते. व्यापक पातळीवरील ही स्पर्धा श्री छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, जेजुरीच्या मुख्याध्यापिका सरिता कपूर, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सासवडच्या प्रिंसिपल रेणुका सिंग मर्चंट आणि सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, खळदचे उपप्राचार्य महेश अजय भालेराव यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी १६ विविध श्रेणींमध्ये सहभाग घेतला आणि प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. (Chandrakant Patil)

पुणे जिल्हा पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की गेल्या ४५ वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत मी अनेक चमत्कार पाहिले आहेत पण असा चमत्कार आज पर्यंत कधीच पाहिला नाही जो अपवादात्मक आहे.एसआयपी ॲकॅडमी ही ॲबॅकस प्रशिक्षण देऊन वास्तवात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीच करत आहे. या वयातील विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाचे विषय शिकण्यापेक्षा दीर्घकालीन कौशल्ये शिकली पाहिजेत. एसआयपी ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी हेच करत आहेत. विद्यार्थ्यांची एकाग्रता पातळी आणि गणना गती पाहून मला खूप आनंद झाला. कोथरूड मतदारसंघातील १०० वंचित विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम मी ३ वर्षांसाठी पूर्णतः प्रायोजित करीन, अशी घोषणा करत आहे.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना एसआयपी अ‍ॅबॅकसचे संचालक श्री. सिबी शेखर म्हणाले, “आगामी काळात १० लाख मनांना स्पर्श करण्याचे आमचे ध्येय असून आम्ही आता प्रत्येक शहरात आमचे नेटवर्क वाढवत आहोत.एसआयपी अॅबॅकस प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उच्च स्तरावरील शिक्षण कौशल्ये देते. त्यामुळे ते भविष्यात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नक्कीच यशस्वी होतील.”

या मेगा इव्हेंटमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील ३८ केंद्रांमधून १६१५ एसआयपी मिनिटांत विद्यार्थी एकत्र आले. या स्पर्धेत मुलांनी ११ मिनिटांत अॅबॅकस, गुणाकार आणि दृश्य अंकगणितीय बेरीज यांतील सुमारे ३०० गणिती समस्या सोडवल्या.

यावेळी एकाग्रता फेरीत पार्श्वभूमीला मोठ्या आवाजात संगीत सुरू असताना मुलांनी ३ मिनिटांत १०० गणित सोडवण्याचा प्रयत्न करत आपल्या आकडेमोडीच्या संगणकीय कौशल्याचे प्रदर्शन केले. ही स्पर्धा म्हणजे एसआयपी ॲबॅकसच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या अंकगणित क्षमता, स्मरणशक्ती आणि एकाग्रता या अपवादात्मक कौशल्यांचे, जे त्यांनी एसआयपी ॲबॅकस प्रोग्रामद्वारे मिळविले आहेत, त़प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ आहे.

Web Title :  Chandrakant Patil | Abacus training is the implementation of National Education Policy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा