Chandrakant Patil | मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन चंद्रकांत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘आमदार व्हा म्हणून नारळ दिला होता का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | मुंबईमध्ये (Mumbai) आमदारांसाठी कायमस्वरूपी घरं देण्यात येतील अशी घोषणा महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली. या निर्णयानंतर राज्यातून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. या निर्णयावर सर्वसामान्याकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. यानंतर भाजपने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला. या निर्णयावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाराजी जाहीर केली आहे.

 

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, “आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात आहे. 2 कोटींचा आमदार निधी कोरोना असतानाही 4 कोटी केला, आता 5 कोटी केला. ड्रायव्हरचे, सहाय्यकाचे पगार वाढवले. त्यात आता घरं दिली जाणार आहेत. कशासाठी घरं पाहिजेत ?”. असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “माझं मुंबईत घर नाही.
पण तरीही हे पैसे तुम्ही शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना द्या यासाठी मी आग्रही असेन.
माझ्यासारखे आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यासारखे सोडले तर प्रत्येकाची 4 – 4 घरं आहेत, क्षमता आहे.
आमदार व्हा म्हणून कोणी नारळ, निमंत्रण दिलं नव्हतं की तुम्ही आमदार व्हा मग घर मिळेल, 5 कोटी मिळतील.
त्यामुळे आमदारांचा रोष सहन करत मी हे योग्य नसल्याचं सांगत आहे.”

जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण..
“आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतो आहे.
मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख रुपये) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलं आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil free mhada houses for mla maharashtra Thackeray government Jitendra Awhad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा