Chandrakant Patil | फडणवीसांना पुण्यातून खासदारकी देण्याच्या मागणीवर चंद्रकांत पाटील म्हणाले -‘फडणवीस स्वत:च्या कर्तुत्वावर इतके वर आले’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुण्यातून खासदारकी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (All India Brahmin Federation) भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून केली आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारण्यात आले. यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि मागणी करण्याचा अधिकार आहे.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या आधारे नाही तर त्यांच्या स्वत:च्या कर्तुत्वावर इतके वरती आले आहेत. त्यामुळे, पक्ष त्यांच्या कर्तृत्वाचा विचार नेहमीच करतो. ब्राह्मण महासंघाने पत्रात म्हटले होते की, प्रत्येक वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुण्यात (Pune) भाजपच्या मागे ठामपणे उभा आहे. त्यामुळे 2024 ला देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.

 

राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा आहे

गोविंदा पथकाला आरक्षणाबाबतच्या घोषणेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरु केलं जात. आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा (Law of Reservation) आहे. खेळामधील 5 टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना आहे. फरक फक्त एवढाच आहे की आधी यात जे खेळ होते, त्यात हा आणखी एक खेळ जोडला आहे. त्यात आरडाओरडा करण्यासारखं काय आहे? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.

 

तर मंगळागौर देखील यात जोडू

आम्हीच यात कुठलेही अधिकचं आरक्षण दिलं नाही. फक्त नवा खेळ या आरक्षणात जोडला गेला आहे.
आता कोणी विटी दांडू आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू.
सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करुन समाजाची दिशाभूल केली जात आहे.
कोणी मागणी केली तर मंगळागौर देखील यात जोडू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil on demand of
brahmin federation to make devendra fadnavis mp from pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा