Chandrakant Patil | बेरोजगार तरुणाने पत्रकारांमध्ये शिरून चंद्रकांत पाटीलांना विचारला प्रश्न, पण शंका येताच….

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrakant Patil | देशात बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे, आणि तरूणांमध्ये कशी अस्वस्थता येऊ लागली आहे, याची उदाहरणे मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. बेरोजगारी आणि इतर मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी दोन तरूणांनी थेट लोकसभेच्या सभागृहात प्रवेश केला होता, यावरून देशात उडालेला गोंधळ अद्याप शमलेला नाही. असाच पण थोडा वेगळा अनुभव आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पुण्यात आला.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित पुस्तक महोत्सवाला (Book Festival) आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद सुरु असताना एक अनोळखी तरुण पत्रकारांमध्ये शिरला आणि चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करू लागला.

या तरुणाने चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना वनविभागाशी संबंधित परीक्षेविषयी प्रश्न विचारला. मात्र, चंद्रकांत पाटील यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित तरुणाला, तुम्ही पत्रकार आहात का?, असा प्रश्न विचारला असता त्याने नाही, असे उत्तर दिले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी, पत्रकार नसाल तर बाजूला व्हा, असे म्हणत त्याला पोलिसांना बाजूला घेण्यास सांगितले.

या तरुणाला वनविभागाची अनेकदा परीक्षा देऊनही नोकरी मिळालेली नाही.
त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांना त्याने प्रश्न विचारला होता.
मात्र, चंद्रकांत पाटील यांनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देणे स्पष्टपणे नाकारले.

पोलिसांनी तरुणाची चौकशी करून त्याला सोडून दिले. या तरूणाचे नाव कुणाल असल्याचे समजले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Police News | शिक्के चोरून बनवले बनावट फिटनेस सर्टिफिकेट, एकाला अटक; ससून हॉस्पिटलमधील प्रकार

Vijay Wadettiwar | ”मराठा समाजाला पुन्हा लॉलीपॉप देण्याचा सरकारचा प्रयत्न”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

Ajit Pawar Group | आव्हाडांनी मारलेला बाण अचूक लागला! भाजपा-आरएसएस बैठकीच्या दाव्यानंतर अजित पवार गटाला कळ

Police Accident News | नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, नारायणगाव पोलीस ठाण्यातील पोलिसाचा मृत्यू