Ajit Pawar Group | आव्हाडांनी मारलेला बाण अचूक लागला! भाजपा-आरएसएस बैठकीच्या दाव्यानंतर अजित पवार गटाला कळ

मुंबई : Ajit Pawar Group | भाजपा (BJP) आणि आरएसएस (RSS) नेत्यांच्या एका बैठकीत आगामी निवडणुकांत इतर पक्षाचे कलंकित नेते सोबत न घेता स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group ) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे. यावर भाजपा आणि आरएसएसऐवजी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) प्रत्युत्तर आले आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला लगावला आहे.

आव्हाडांच्या दाव्यावर सोशल मीडियावर प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, सावलीसारखे सोबत असलेले कार्यकर्ते सोडून गेले हे त्यांना कळले नाही, पण संघ आणि भाजपच्या बैठकीत काय घडले हे त्यांना समजले. हल्ली इतक्या अंतर्गत गोटात शिरले आहेत, याचे कौतुक वाटते. (Ajit Pawar Group)

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, नागपूरमधील हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2023) संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असं ठरवण्यात आलं. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असं भाजप-आरएसएसच्या बैठकीत ठरवण्यात आलं. ज्यांना राजकारण समजतं; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजलं असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar | ”मराठा समाजाला पुन्हा लॉलीपॉप देण्याचा सरकारचा प्रयत्न”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर रिक्षाची ट्रॅव्हल्सला धडक, एकाचा मृत्यू

Pune Pimpri Chinchwad Police News | भागीदाराची पाच कोटींची फसवणूक, बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल; वारजे परिसरातील प्रकार

Pune Police MPDA Action | वारजे माळवाडी परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 73 वी स्थानबध्दतेची कारवाई

Benefits Of Raw Garlic | सकाळी अनोशापोटी कच्चा लसूण खाल्याने होतात जबरदस्त फायदे…