Vijay Wadettiwar | ”मराठा समाजाला पुन्हा लॉलीपॉप देण्याचा सरकारचा प्रयत्न”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबई : Vijay Wadettiwar | निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा समाजाला लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. लॉलीपॉपशिवाय दुसरे काही नाही. आरक्षण (Maratha Reservation) देण्याची नियत सरकारमध्ये नाही. ओबीसी समाजासाठी (OBC Reservation) व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष काही करण्याची यांची मानसिकता नाही, असाही घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचे आश्वासन दिल्यानंतर वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ही टीका केली.

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) क्युरेटीव्ह याचिकेच्या माध्यमातून आरक्षण टिकविण्याचा एक मार्ग खुला झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आरक्षण टिकविण्यासाठी सरकार प्रभावी बाजू मांडेल. परंतु तेथे अपयश आले तर पुन्हा एकदा कायदा केला जाईल. त्यासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या जर-तरच्या आश्वासनावरून वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा, धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) विषय अधांतरी आहे.
ते म्हणतात आम्ही फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊ. परंतु, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता लागेल. आचारसंहितेत तो विषय मार्गी लागणार नाही.

मराठा आरक्षण मिळाले नाही तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)
म्हणाले आहेत. या प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकार, मुख्यमंत्री आणि जरांगे हे बघून घेतील.
हा त्यांचा प्रश्न आहे, त्यात आम्हाला पडण्याची गरज नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर रिक्षाची ट्रॅव्हल्सला धडक, एकाचा मृत्यू

Pune Pimpri Chinchwad Police News | भागीदाराची पाच कोटींची फसवणूक, बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल; वारजे परिसरातील प्रकार

Pune Police MPDA Action | वारजे माळवाडी परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 73 वी स्थानबध्दतेची कारवाई

Benefits Of Raw Garlic | सकाळी अनोशापोटी कच्चा लसूण खाल्याने होतात जबरदस्त फायदे…