Police Accident News | नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, नारायणगाव पोलीस ठाण्यातील पोलिसाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Police Accident News | नगर-कल्याण महामार्गावर (Nagar-Kalyan Highway) ढोगी शिवारात भरधाव वेगातील स्विफ्ट गाडी (एमएच 14 जीएस 4220) झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) कार्यरत असलेले पोलीस शिपाई महेश तुकाराम काठमोरे (Police constable Mahesh Tukaram Kathmore) यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू (Death) झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि.19) रात्री साडे अकराच्या सुमारास महामार्गावरील हॉटेल समर्थ नाष्टा सेंटर समोर झाला. (Police Accident News)

या अपघातात कार चालक साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे (दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस शिपाई महेश कामोठे पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील रहिवासी होते. जखमी झालेल्या दोघांवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने पारनेर चे सहायक पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ (API Pramod Wagh) व सहायक फौजदार संदीप गायकवाड (PSI Sandeep Gaikwad) यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. (Police Accident News)

याप्रकरणी कार चालक साहील करीम हुसेन खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश तुकाराम काठमोरे यांनी फिर्याद दिली आहे. महेश काठमोरे हे 19 डिसेबरला सुट्टी असल्याने गावी गेले होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास परत नारायणगाव येथे जाण्यासाठी मित्र साहील खान व गणेश शिंदे यांच्यासह गावातील वाहीद शेख यांची स्वीफ्ट कार घेऊन जात होते. साहील खान हा गाडी चालवत होता. तर महेश काठमोरे हे पुढील सीटवर बसले होते. गाडी भरधाव वेगात असल्याने साहील खान याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार झाडावर जाऊन आदळली. यामध्ये महेश काठमोरे यांचा जागीच मृत्यू झाला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar | ”मराठा समाजाला पुन्हा लॉलीपॉप देण्याचा सरकारचा प्रयत्न”, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर रिक्षाची ट्रॅव्हल्सला धडक, एकाचा मृत्यू

Pune Pimpri Chinchwad Police News | भागीदाराची पाच कोटींची फसवणूक, बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल; वारजे परिसरातील प्रकार

Pune Police MPDA Action | वारजे माळवाडी परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 73 वी स्थानबध्दतेची कारवाई

Benefits Of Raw Garlic | सकाळी अनोशापोटी कच्चा लसूण खाल्याने होतात जबरदस्त फायदे…