Chandrakant Patil | मुंबै बँक निवडणूकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘त्यांना पुर्णपणे संपवण्याचा…’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक (Mumbai Bank Election) गुरुवारी (दि.13) पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीने (NCP) एकत्र येत भाजपला (BJP) एक जोरदार धक्का दिला. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. समसमान मत पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये भाजपचे उमेदवार विठ्ठल भोसले (Vitthal Bhosle) यांची निवड झाली. उपाध्यक्ष पद हातातून गेल्याने हा एक शिवसेनेला धक्का बसला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना पूर्णपणे संपवण्याचा एक ‘प्लान’ सुरु आहे, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबै बँकेच्या अध्यक्षपद मिळवण्यात यश मिळवलं पण शिवसेनेचा उमेदवार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडला..
कसं झालं हे? आता हे शिवसेनेला कळत नाहीये की, तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन (Plan to Completely Eliminate) चालला आहे आणि त्या प्लॅनमध्ये तुम्ही फसत चालला आहे.

 

आता तुम्ही उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) आणि गोव्यात (Goa) ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या (Sharad Pawar) आवाहनाला प्रतिसाद देऊन चालले आहात.
शिवसेनेला अशी सवयच आहे की गेले आणि डिपॉझिट (Deposit) जप्त झाले.
राष्ट्रवादीची त्या निमित्ताने मतं वाढतात आणि एक अखिल भारतीय पक्ष होण्यासाठी कमीत कमी मतदारांची, मतांची आवश्यकता असते… तुम्ही का सर्व ठिकाणी जाऊन पराभव करत आहात ? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

 

Web Title :  Chandrakant Patil | chandrakant patil said there is conspiracy to end shiv sena in mahavikas aghadi after mumbai bank president election result

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा