मुख्यमंत्री पद मिळालं तर मग काय सोडणार काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि चंद्रकांत पाटील यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक प्रश्न विचारला जातो. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहात का ? यावर त्यांनी अनेक वेळा उत्तरे दिली आहेत. मात्र, पुण्यात हाच प्रश्न त्यांना पुन्हा विचारला असता त्यांनी उत्तर दिलेल्या उत्तराने अनेकांचे भुवया उंचावल्या. पत्रकारांनी विचारलेल्या याप्रश्नावर त्यांनी मग काय सोडणार काय ? चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या उत्तरावर सगळेच अवाक् झाले.

आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे की नाही हे जनता ठरवेल. कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो असंही ते म्हणाले. बारामती लोकसभा निवडणुकीला ४० टक्के मतदारांनी शरद पवार यांना नाकारल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हाऊस फुल्लचा बोर्ड लागला असला तरी थिएटर वाल्यांकडे स्वत:ची दहा तिकटे असा सूचक इशाराही त्यांनी पत्रकरांशी बोलताना दिला.

सध्या ईव्हीएम मशीन विरोधात विऱोधकांनी मोर्चे बाधणी केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले, निवडणूक आयोगाने ठरवलं तर हात वर करून आवाजी मतदानाला ही भाजपा तयार आहे. मतपत्रिकेवरही लढू, कशावरही लढलो तरी आम्हीच जिंकू असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच जागा वाटपा बाबात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुत्र ठरले आहे. ५०-५० असे होईल. शक्यतो विजयी जागा बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्यविषयक वृत्त