Chandrakant Patil | ‘भलेही ते विरोधक असतील, पण काँग्रेसने कधीही जातीपातीचं राजकारण केले नाही’ – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kolhapur Assembly By – Election) पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) सडकून टीका केली. पण, त्याचबरोबर काँग्रेस (Congress) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणाले, मी पहिल्यापासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फरक करत आलो आहे. राष्ट्रवादीने नेहमीच ब्राम्हण (Brahmins) आणि बहुजन (Bahujans) असे जातीपातीचे राजकारण (Caste Politics) केले आहे. पण काँग्रेसने तसे कधीही केले नाही. भले विरोधक असतीलही पण पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), विखे – पाटील (Vikhe-Patil), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी कधीही असले राजकारण केले नसल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही कौतुक केले आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंनी जे भाषण केले. त्यामुळे स्वर्गीय नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आठवण झाली. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर जी टीका केली त्याबद्दल आम्ही वारंवार बोलत होतो. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीय तेढ वाढले गेले आहेत. या राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. इतकच नाही तर राज ठाकरे यांच कौतुक करत आमच्याशी दोस्ती करायची असेल तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यावर बोललेले आम्हाला कदापीही खपणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितले.

 

हिंदूंनी (Hindu) जातीय दंगलीच्या भीतीने दक्षता घ्यायची आणि बाकीच्यांनी मात्र, तोडफोड, मारहाण करत सुटायचे. मुस्लिमांनीही (Muslims) धर्माचे पालन केले पाहिजे. मूळातच हा देश हिंदूंचा आहे. इकडे मुस्लिम समाजाने आक्रमण केले आहे. मशिदीमध्ये जाऊन हिंदूंनी कधीही तोडफोड केली नाही. जशी तुमची आजण चालली पाहिजे तशी आमची आरतीही चालली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

काश्मीर फाईल्सचे मोदी काय डायरेक्टर आहेत का ?
काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मोदींनी परवानगी द्यायला नको होती असं म्हणता.
मूळात यांचा प्रयत्न प्रत्येक विषयाला हिंदू आणि मुस्लिम असा रंग आणण्याचा आहे.
विषय कोणताही असला तरी ब्राम्हण आणि बहुजन समाज असा वाद काँग्रेसने कधीही केला नाही.
काँग्रेस कशीही असू दे. त्यांनी मुस्लिम समाजाची बाजू घेऊ दे.
पण त्यांनी कधीही असे जातीपातीचे राजकारण केले नाही. किंबहूना ते पडत देखील नाही.

 

पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विखे पाटील घराणे आहे, त्यांनी कधी असं जातीपातीचे आणि पाडापाडीचे राजकारण केले नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याउलट राष्ट्रवादी पक्ष आहे. प्रत्येक मतदार संघात किती जाती आहे याचा शोध घेऊन तेथे त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करायेच हे आजपर्यंत चालत आले आहे.
आता यूपीए अध्यक्षाची (UPA President) चर्चा रंगली आहे. परंतु, बुडत्या जहाजाचे कॅप्टन कोण होणार हा महत्वाचा प्रश्न आहे.
त्यामुळे अध्यक्षपदासाठी पवार रस दाखवत नसल्याचा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

 

दरम्यान, यावेळी कोल्हापूर पोटनिवडणूकीत पेटीएम द्वारे मतदारांना पैसे वाटप होण्याची पाटील यांनी शक्यता वर्तवली आहे.
ज्या विभागात असे प्रकार घडतील त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

Web Title :- Chandrakant Patil | congress has never done caste politics say bjp leader chandrakant patil at kolhapur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा