Maratha Reservation | ‘…तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे येईल त्याला भाजपाचा पाठिंबा राहील’ – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती MP Sambhaji Raje Chhatrapati यांनी कालच आक्रमक पवित्रा घेत मराठा आरक्षणाबाबत Maratha Reservation 16 जूनपासून राज्यात मूक आंदोलन करणार असल्याच स्पष्ट केलं तसेच हे आंदोलन कोल्हापूरपासून Kolhapur सुरु करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी मराठा आरक्षण आणि खा. संभाजीराजे यांच्या भूमिकेवर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संभाजीराजेंनी मोर्चाबाबत चालढकल केली तर मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation लढाईसाठी जो कोणी पुढाकार घेईल, त्याच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष BJP उभा राहणार असल्याची स्पष्टोक्ती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यावेळी पाटील हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

रिलायन्स इंडस्ट्रीजने बंद केले जामनगरचे युनिट, जाणून घ्या कारण

चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले, खासदार संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार तर दुसऱ्यावेळी ‘लाँग मार्च’ काढणार अशी भूमिका घेत आहेत.
परंतु, 16 जून रोजी कोल्हापुरमध्ये मराठा मोर्चा Maratha Morcha निघणार का, याची शाश्वती देता येत नाही.
तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे.
आरक्षणाच्या Maratha Reservation बाबतीत जर वेळ निघून गेली तर मराठा समाजाचं Maratha society, मोठं नुकसान होणार आहे.
म्हणून खा. संभाजीराजे यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी तर मिळणार नाही ना, याचा विचार करणं त्यांनी गरजेचं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, आरक्षणासाठी मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात चालढकल झाली,
तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे.
असं झालं तर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल अथवा काय होईल, ते माहिती नाही.
संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला या मोर्चाला माझा पाठिंबा जाहीर केला होता.
आता त्यांनी आपल्या निर्णयावरून माघार घेतली तरी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेत फरक पडणार नाही.
दुसऱ्या कुणी देखील कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यास पुढाकार घेतला तर त्याला भाजपाचा पाठिंबा राहील. असं स्पष्ट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात