Chandrakant Patil | ‘पदवीधर विकास’च्या बांधिलकी विशेषांकाचे प्रकाशन; चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकणाऱ्या पदवीधर विकासच्या बांधिलकी या विशेषांकाचे प्रकाशन ना.‌पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभारंभ लॉन्स येथे करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), कोथरूड विधानसभा निवडणूक प्रमुख पुनीत जोशी (Punit Joshi), संपादक भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) व अनेक मान्यवर उपस्थित होते. (Chandrakant Patil)

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा ६४ वा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी राखून आरोग्य सेवेसाठी समर्पित केला. नामदार पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नामदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Birthday) यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकणारा पुणे पदवीधर विकास या मासिकाच्या वतीने ‘बांधिलकी’ हा तयार करण्यात आला होता. (Chandrakant Patil)

या विशेषांकात नामदार चंद्रकांत पाटील यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलेले निर्णय, पुणे जिल्ह्याच्या विकासातील योगदान आदींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

 

संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी विशेषांका पाठिमागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,
पुणे पदवीधर मतदार संघासाठी गेल्या १२ वर्षांपासून पदवीधर
विकास हे मासिक प्रकाशित होत आहे व नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
नामदार चंद्रकांतदादा पाटील हे जनते प्रति समर्पित व्यक्तीमत्व असून,
आर्थिक दृष्ट्या दुर्बलांचे दु:ख दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. उच्च व तंत्रशिक्षण विभाग व पुणे जिल्ह्याच्या विकासात ही त्यांनी मोलाची भर घातली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेषांक प्रकाशित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title : Chandrakant Patil | Publication of Commitment Special Issue on ‘Graduate Development’; A look at Chandrakantada Patil’s work


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा     

Pune Zilla Parishad | पुणे : निर्मलवारीसाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज

Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | ‘वेळ आली तर सत्तेला ठोकर मारायला आम्ही तयार’,
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

Ajit Pawar On Devendra Fadnavis | ‘ही भाकरी फिरवणे नव्हे, तर निव्वळ धूळफेक’, फडणवीसांच्या टीकेवर
अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…