चंद्रकांत पाटलांना स्वाभिमानीने दाखविले काळे झेंडे

ADV

राहुरी : पोलीसनामा ऑनलाईन – महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कृषी विभाग व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथे किसान आधार संम्मेलन भरवण्यात आले आहे. या संम्मेलनाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमादरम्यान पाटील यांच्या भाषणात अडथळा निर्माण करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी केली.

 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b060778-d131-11e8-9f4f-69ec52a898c6′]

चंद्रकांत पाटील यांचे मुख्य भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे, प्रकाश देठे, सतीश पवार आदी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी पुढे जाऊन नामदार पाटील यांना काळे झेंडे दाखवले. त्याचबरोबर दुधाला भाव द्या, कबूल केलेले अनुदान ताबडतोब द्या, शेतमाल खरेदी केंद्र सुरू करा, बोंड आळी अनुदान त्वरित मिळावे, राज्यात सर्वत्र दुष्काळ जाहीर करा, अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यकत्र्यांना बाहेर नेले. या दरम्यान ना.पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना भाषणातून कोणतेही उत्तर दिले नाही, अथवा भाषणदेखील बंद केले नाही. आंदोलनकर्त्यांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

[amazon_link asins=’B0745BNFYV,B0784BZ5VY,B07DJHV6S7,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’759f3242-d131-11e8-8c46-59128a3ccc12′]

आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे, पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र सिंह, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
शिवतारेंच्या आश्वासनानंतर स्वाभिमानीचे आंदोलन मागे
फलटण : न्यू फलटण शुगर वक्र्स साखरवाडी ता. फलटण या कारखान्याच्या गाळप हंगामातील ऊसाचे सुमारे ५१ कोटी रूपये आणि कामगारांच्या पगारापोटीचे ८ कोटी रूपये त्वरीत मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन सुरू केले होते. अखेर २७ दिवसानंतर साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

जाहिरात