Chandrakant Patil | ‘एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार हे ‘महाविकास’च्या महाभकास धोरणांचेच अपयश’ – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Chandrakant Patil | राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांचे (ST workers) राज्यव्यापी संप सुरू आहे. या कामगांराच्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यावधीचा फटका बसला. तसेच प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) विरोधी पक्ष ताशेरे ओढत आहेत. यातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्वीटच्या माध्यमातून आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात प्रसंगी आपल्या घरापासून दूरवरच्या शहरांमध्ये राहून ज्यांनी कोरोनाशी चाललेल्या युद्धात सहभाग घेतला. अशा एसटी कर्मचाऱ्यांवर एल्गार (ST Strike) करण्याची वेळ यावी. हे महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) महाभकास धोरणांचेच अपयश आहे. हा जुलूम आघाडी सरकारने त्वरित थांबवावा. असं पाटील म्हणाले.

 

पुढे पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेल्या संवेदना पूर्णपणे मेल्या आहेत. त्यांच्या या गलिच्छ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना न केवळ संप करावा लागत आहे. तर थेट आत्महत्येचा पर्याय निवडावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकार का पूर्ण करत नाही?, एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून आणखी किती दिवस संप करतच काढावे लागणार?, गेले 17 महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही, त्यात तुटपुंजा दिवाळी बोनस, आपलं कुटुंब ते कसे सांभाळणार?, आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा सरकारच्या मंत्र्यांसाठी अभिनेत्याचा मुलगा महत्त्वाचा आहे का? निर्दयी आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

 

Web Title : Chandrakant Patil | st employees failure policies mahavikas aghadi government said bjp leader chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nana Patole | मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांची चौकशी करावी – काँग्रेस

Pune Traffic | पुण्यातील कामगार पुतळा, राजीव गांधी वसाहत पुनर्वसन कारवाई गुरूवारी; शिवाजीनगर कोर्टाजवळील परिसरातील वाहतूक मार्गात बदल

Mayor Muralidhar Mohol | महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस ! मुरलीधर मोहोळांवर रक्तदानरुपी शुभेच्छांचा वर्षाव, 3860 जणांकडून रक्तदान; लेकीसह महापौरांकडून ‘महादान’ !