दुष्काळ जाहीर करण्यास चंद्रकांत पाटील मुहूर्ताची वाट का बघत आहेत ? : अजित पवार 

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन – यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने  राज्यातील अनेक भागात पाणी प्रश्न आताच निर्माण झाला. पाण्याअभावी शेतकऱ्यांना तसेच इतर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे शेतकरी वर्ग अडचणीमध्ये आला आहे. मागेच काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारनेही दुष्काळ जाहीर केला होता. असे असतांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी चंद्रकांत पाटील हे मुहूर्ताची वाट का बघत आहेत का अशा शब्दात सवाल उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्राकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

महापालिकेच्या कर्मचाऱ्याची  मुजोरी… कचरा गोळा करण्यासाठी घेतात पैसे

दरम्यान 31 ऑक्टोबराला दुष्काळ जाहीर करू असे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते,  राज्यसरकारने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही काढण्यात आला. हरू मेमोरियल हॉलपासून विभागीय आयुक्त कार्यलयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. इतकेच नाही तर या मोर्चामध्ये राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. एवढेच नाही तर  यावेळी अजित पवार यांनी राज्यातील अनेक प्रश्नावर भूमिका देखील मांडली.

सरकारला जुमलेबाज म्हणणारी शिवसेनाच मोठा जुमला : विखे पाटील

यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘देशातील अनेक राज्यांनी दुष्काळ जाहीर केला असताना हे सरकार एवढा वेळ दुष्काळ जाहीर का करण्यास का लावत आहे.यातून या सरकारची मानसिकता दिसत आहे.तर यंदा भूजल पातळी खाली गेली असून त्यामुळे जलयुक्त शिवाराची कामे कशा प्रकार झाली आहेत. हे यातून दिसून येत आहे. तर जलयुक्त शिवाराबाबत केंद्रातील आणि राज्यातील सत्तेत असणारा शिवसेना भाजपवर टीका करीत आहे. सत्तेमध्ये असून भाजपवर टीका करणे योग्य नसून भाजप आणि शिवसेना राज्यातील परिस्थितीला जबाबदार आहेत.अशा शब्दात अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. पुढे ते असेही म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या मालास हमी भाव मिळाला पाहिजे, दूधला चांगला भाव मिळाला पाहिजे.’ इतकेच नाही तर यासह अनेक मागण्याची दखल सरकारने घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल.असा इशारा त्यांनी यावेळी दिला.