Chandrapur Crime | व्हॉट्सअॅपवर ‘Bye bye’ स्टेटस ठेवत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrapur Crime News । चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील खडसंगी (Khadsangi) येथे अजब प्रकारे आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘WhatsApp’ ला ‘बाय बाय’ स्टेटस (‘Bye bye’ status) ठेवून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Chandrapur Crime) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. संदीप चौधरी (वय, 25) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, संदिपचे खडसंगी (Khadsangi) येथे स्वतःचं मिठाईचे दुकान आहे. दरम्यान
शुक्रवारी (दुपारी त्याने ‘WhatsApp’ ‘बाय बाय’ स्टेटस ठेवून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. संदीपचे हे स्टेटस (Status) पाहून त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी संदीपच्या घरी धाव घेतली. परंतु, तोवर जादा उशीर झाला होता. या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. संदिपने कोणत्या कारणाने आत्महत्या (Suicide) केली हे अजून अस्पष्ट आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत.
या दरम्यान, ‘2 जुलै रोजी संदीप चौधरीचा (Sandeep Chaudhary) 25 वा वाढदिवस होता. तर त्याचा
विवाह देखील ठरला होता. तसेच, टोकाचे पाऊल उचलण्यामागचे देखील कारण अद्याप कुटुंबीयांना देखील
समजून शकले नाही. अशा आत्महत्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.