Builder Paranjape Brothers | पुण्यातील परांजपे बंधूंविरोधात वसुंधरा डोंगरेंच्या वकिलांकडून 545 पानांचे पुरावे न्यायालयात सादर; अटकपुर्व जामिनावर 29 जुलैला सुनावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – विलेपार्ले भूखंड घोटाळा प्रकरणात पुण्यातील (Pune News) नामांकित बिल्डर परांजपे बंधू (Builder Paranjape Brothers) यांच्या विरोधात तक्रारदार वसुंधरा डोंगरे (Vasundhara Dongre) यांच्या वकिलांनी शुक्रवारी दिंडोशी कोर्टात (Dindoshi court) जवळपास 545 पानांचा ‘पुरावे’ सादर केले.. यामुळे परांजपे बंधूंच्या (Builder Paranjape Brothers) अटकपूर्व जामिनावरील (Pre-arrest bail) सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता यावर पुढील सुनावणी 29 जुलै रोजी करण्यात येणार आहे.

545 पानी पुरावे कोर्टात सादर

वसुंधरा डोंगरे यांच्या वकिलांनी कोर्टात काही कागदपत्रे सादर करायची असल्याने त्यांनी न्यायालयाकडे 16 जुलै 2021 पर्यंत वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार शुक्रवारी डोंगरे यांचे वकिल अ‍ॅड. जगदीश शिंगाडे (Adv. Jagdish Shingade) यांनी 545 पाना पुरावे सादर केले आहेत. यामधून बिल्डर परांजपे यांनी कशा प्रकारे लोकांची फसवणूक केली याचा खुलासा कोर्टासमोर होणार आहे, असा दावा फिर्यादी वसुंधरा डोंगरे यांना आहे.

Builder Paranjape Brothers | Vasundhara Dongre’s lawyers present 545 pages of evidence against the Paranjape brothers of Pune in court; Hearing on pre-arrest of paranjape brothers bail on July 29

विनाकारण त्रास दिला जातोय

डोंगरे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसून त्यांना विनाकारण जुन्याच प्रकरणात गुंतवून तसेच त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन त्यांना त्रास दिला जात आहे, असे परांजपे यांचे वकील अ‍ॅड. निरंजन मुंदरगी यांनी सांगितले होते.

विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीमधील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर आणि जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रारदार वसुंधरा डोंगरे (वय-70) यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरुन विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर श्रीकांत परांजपे (Shrikant Paranjape) आणि शशांक परांजपे (Shashank Paranjape) यांना पुण्यातील राहत्या घरातून चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. चौकशीनंतर त्यांना तात्काळ सोडून देखील देण्यात आलं होतं.

आरोपींची कार्यपद्धत समोर येणार

तक्रारदार वसुंधरा डोंगरे यांचे वकिल अ‍ॅड. जगदीश शिंगाडे यांनी सांगितले की, आम्ही पुण्यातील परांजपे
बिल्डर(Builder Paranjape Brothers) विरुद्धच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात (vile parle police
station) दाखल गुन्ह्यात दिंडोशी न्यायालयात (dindoshi court) फिर्यादी यांच्या वतीने हस्तक्षेप अर्ज व
त्यांचे म्हणणे मांडले आहे. त्यांच्या पहिल्या 45 पानांत फिर्यादीने अनेक गोष्टींचा उलगडा करत आरोपींची
विविध प्रकरणातील कार्यपद्धती दर्शविणारी कागदपत्रे पुरावा म्हणून जोडली आहेत. यामध्ये एकूण 106 दस्त
म्हणजे तब्बल 450 पानांचा समावेश आहे. या प्रकरणावर 29 जुलै 2021 रोजी सुनावणी होणार आहे.

हे देखील वाचा

Bindi Skin Allergy | टिकली लावल्याने त्वचेची ॲलर्जी होत असेल तर करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

MLA Praniti Shinde | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर FIR; जाणून घ्या कारण

Praveen Darekar | ‘पवार-मोदी भेटीत नुसती हवा-पाण्याची चर्चा होणार नाही, राजकीय चर्चा तर होणारच’

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Builder Paranjape Brothers | Vasundhara Dongre’s lawyers present 545 pages of evidence against the Paranjape brothers of Pune in court; Hearing on pre-arrest of paranjape brothers bail on July 29

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update