Chandrashekhar Bawankule | ‘ज्यांना तुम्ही बाजार बुणगे म्हणत आहात, कधीकाळी…’, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळेंचा पलटवार म्हणाले ‘आधी बुडाखाली…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी पोहरा देवीचे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात केली. ठाकरेंचा विदर्भ दौरा (Vidarbha Tour) म्हणजे नौटंकी आहे अशी टिका भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली होती. बावनकुळे यांच्या टिकेला उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ मध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले होते. भाजप हा पक्ष आता काहीही बोलायच्या लयकीचा राहिलेला नाही, अशा शब्दात ठाकरेंनी पलटवार केला होता.

 

बुडाखाली असलेला अंधार बघा – बावनकुळे

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेजी तीन वर्षांपूर्वी तुम्ही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) घरात घुसवून घेतली होती. याचा तुम्हाला विसर पडला काय? ज्यांना आज तुम्ही बाजारबुणगे म्हणत आहात कधीकाळी त्यांच्याच (Maharashtra Politics News) जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झाला होतात. तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले हे विसरू नका, असं म्हणत बावनकुळे यांनी टिका केली आहे.

 

 

तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवता आलं नाही आणि पक्षप्रमुख म्हणून पक्षही सांभाळता आला नाही. तुम्हाला मिळत असलेला ‘प्रचंड प्रतिसाद’ पाहून तुमचे उरलेले साथीदारही तुमची साथ सोडत आहेत आणि येत्या काळातही लोक तुम्हाला सोडून जाणार आहेत. त्यामुळे भाजपवर टीका करण्याआधी बुडाखाली असलेला अंधार बघा, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

भाजप आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीये. भाजपने आता कोणावरही दोषारोप करण्याचे सोडून द्यावे.
आता त्यांनी त्यांच्या घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांचा सांभाळ करावा. दुसऱ्यांवर टीका करत बसू नये,
अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

 

 

Web Title :  Chandrashekhar Bawankule | bjp chandrashekhar bawankule slams uddhav thackeray over his bjp statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा