Chandrashekhar Bawankule | कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत बावनकुळे स्पष्टच बोलले; म्हणाले – ‘श्रीकांत शिंदे यांची क्षमता…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha Constituency) जागेवरुन भाजप (BJP) आणि शिंदे गटात (Shinde Group) वाद सुरु आहे. कल्याण मतदारसंघात भाजप कार्यकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल, अन्य कोणीही उमेदवार येथे सहन करणार नसल्याची भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली. आहे. यामुळे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंच्या (MP Shrikant Eknath Shinde) उमेदवारीवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. श्रीकांत शिंदे यांची क्षमता खूप आहे, भाजप त्यांना ताकदीने मदत करुन यावेळी मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतांनी निवडून आणतील, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांना येथून कोणीही हलवू शकत नाही. भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा देतील, असे बावनकुळे म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजप-शिंदे गटातील वादावर बोलताना बावनकुळे म्हणाले,
डोंबिवली येथील भाजपचे बुथप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला संपूर्ण पाठिंबा देणार आहेत.
श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघातून निवडून आले आहेत.
त्यांनी तेथून कोणीही हलवू शकणार नाही.
मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जास्त मतांनी त्यांना निवडून आणू. ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, त्यांची क्षमता खूप आहे. भाजप तेवढ्याच ताकदीने श्रीकांत शिंदे यांना मदत करेन.

 

Web Title : Chandrashekhar Bawankule | chandrashekhar-bawankule-on-kalyan-loksabha-constituency-mp-shrikant-shinde-dispute-with-bjp


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा     

Palkhi Sohala 2023 | न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका! वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

Chandrakant Patil | ‘पदवीधर विकास’च्या बांधिलकी विशेषांकाचे प्रकाशन; चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप

Palkhi Sohala 2023 | आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट – पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे (VIDEO)

Prakash Ambedkar | ‘मविआत उद्धव ठाकरे सोडले तर…’, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा