Chandrashekhar Bawankule On Rohit Pawar | ‘पवार साहेबांनी कुणालाही स्वतःपेक्षा मोठे होऊ दिलं नाही’, रोहित पवारांच्या ‘त्या’ टिकेला भाजपचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule On Rohit Pawar | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. पडळकरांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं असून आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लहान नेत्यांना पुढं करता आणि मोठे नेते फक्त तमाशा बघतात, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. (Chandrashekhar Bawankule On Rohit Pawar)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रोहित पवारांनी भाजपबद्दल बोलताना जरा विचार करुन बोललं पाहिजे. आपल्या पक्षाचे संस्कार आणि संस्कृती बघितली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदाराच्या पोटातून आमदार आणि खासदाराच्या पोटातून खासदार तयार होतात, असा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष आहे. शरद पवार यांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्या लोकांना कधीही मोठं होऊ दिलं नाही. त्यांनी काही लोकांना मोठं केलं, पण त्यांना त्यांच्यापेक्षा मोठं होऊ दिलं नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. (Chandrashekhar Bawankule On Rohit Pawar)

https://x.com/cbawankule/status/1704472996172415139?s=20

काय म्हणाले रोहित पवार

गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर रोहित पवार म्हणाले, भाजपाचे मोठे नेते मुद्दामहून अशा छोट्या नेत्यांना पुढे करतात
आणि विशिष्ट नेत्यांविरोधात बोलायला लावतात. गोपीचंद पडळकर हे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बोलले, ते आम्ही समजू शकतो. कारण आम्ही विरोधात आहोत. परंतु अजित पवार त्यांच्यासोबत आहेत. तरीही ते त्यांच्याबद्दल बोलतात, म्हणजे वरिष्ठ नेते सांगतात की अजित पवारांचं महत्त्व कमी करा. आम्ही भाजपला चांगलं ओळखतो, ते लोकनेत्यांना संपवण्याचं काम करतात, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार पुढे म्हणाले, अजितदादा आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांना आम्ही हेच सांगत होतो की,
भाजपाबरोबर जाऊ नका. हे लोक आपला लोकांमधील आदरयुक्त वचक कमी करण्याचा प्रयत्न करतात.
छोट्या नेत्यांना पुढं करायचं आणि मोठे नेते फक्त तमाशा बघतात, ही भाजपाची प्रवृत्ती आहे.
ही बाब तिकडे गेलेल्या नेत्यांना कळावी, हेच आमचं मत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Smriti Irani To Sonia Gandhi | महिला आरक्षणाचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस-भाजपामध्ये जुंपली, स्मृती इराणींचे सोनिया गांधीना प्रत्युत्तर