Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar & Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळे यांची जहरी टीका; म्हणाले – ‘फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार व उद्धव ठाकरे…’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar & Uddhav Thackeray | महायुती सरकारमध्ये भाजपा पक्ष सध्या मोठ्या भावाची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राष्ट्रावादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये मोठे बंड झाले असून अनेक आमदारांनी भाजपाची साथ दिली. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शरद पवार यांच्यावर भाजपाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन्ही गटातील नेत्यांवर हल्लाबोल केला असून देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपला उरलेला पक्ष शोधत आहेत अशी जहरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी तासगावमधून केली आहे. (Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar & Uddhav Thackeray)

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज सांगली दौरा असून त्यांनी तासगावमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका देखील केली. बावनकुळे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करणाऱ्यांना लोकांना घरी बसावं लागलं. बेईमानीचा बदला हा काळच घेतो. उद्धव ठाकरे शिवसेना कुठं गेली, हे शोधत आहेत. तर, पक्ष कुठं-कुठं राहिला, यासाठी शरद पवार दिल्लीत बैठका घेत आहेत. पण, किंचित राहिलेला पक्ष संपवून टाकण्याचं काम तासगावमधून करायचं आहे.” अशा शब्दांमध्ये बावनकुळेंनी शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाला टोला लगावला आहे. (Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar & Uddhav Thackeray)

फडणवीसांच्या विरोधामध्ये शरद पवारांनी कटकारस्थाने रचली असा घणाघात देखील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला आहे.
ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून शरद पवारांनी कटकारस्थानं रचली.
देवेंद्र फडणवीस अष्टपैलू नेते आहेत. फडणवीसांनी कधीही स्वत:साठी नाहीतर समाजासाठी काम केलं.
महायुतीमध्ये भाजपाच मोठा भाऊ आहे. कुटुंब आणि आघाडीत मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणं,
अशी पूर्वीपासून भाजपाची भूमिका आहे, त्यात काहीच वावगं नाही.” असे बावनकुळे यांनी सांगितले.

लवकरच राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे असे देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
असे झाले तर 14-15 मंत्री वाढतील आणि पालकमंत्री देखील वाढतील, सरकारी कामे व योजनांना गती मिळेल.
सरकारमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींची कामे आता होत आहेत.
असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तासगावमध्ये सांगितले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिका: शहरी गरीब योजनेची उत्पन्न मर्यादा एक लाख 60 हजारांपर्यंत वाढवली, पण तांत्रिक कारणास्तव महिन्याभरापासून अंमलबजावणीच नाही

Pune Crime News | एटीएम कार्ड चोरून पैसे काढून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी विश्रांतवाडी पोलिसांकडून गजाआड