Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंच्या सभेवर टीका, म्हणाले – ‘सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरु’ (व्हिडिओ)

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | भाजप (BJP) हा मुस्लिमांच्या (Muslim विरोधात काधीही नाही. परंतु जे दोन चार टक्के आहेत. ते हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करु पाहतात. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. विरोधकांचे काम असते लोकांचे प्रश्न सरकार पुढे मांडून ते सोडवणे. परंतु सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरु आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) रविवारी बारामती येथे भाजप कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच यावेळी इंदापूर व बारामती मध्ये भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) 52 शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
| LIVE | 📍 पलटण | माध्यमांशी संवाद https://t.co/T5TXW61rpK
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 26, 2023
बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्यानंतर आमच्याही सभा होतील. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. जनतेच्या कोर्टामध्ये आता याचा फैसला होईल. महाराष्ट्राच्या जनतेला आता टिक्काटिप्पणी नको असून त्यांना विकास पाहिजे आहे, असे बावनकुळे म्हणाले.
नीरा नदीमध्ये या परिसरातून अनेक कारखान्याचे प्रदूषित पाणी तसेच बेकायदेशीर कत्तलखान्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर मिसळले जात आहे.
यामुळे उग्र वास याठिकाणी येत आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, हे सर्व भयंकर आहे.
निश्चित सरकारने यावर उपाययोजना केली पाहिजे. शेतकऱ्यांचा हा प्रश्न मी मुख्यमंत्री आणि
उपमुख्यमंत्री यांच्यासमोर माडून तो सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
Web Title :- Chandrashekhar Bawankule | only the taunting of the current opposition continues chandrasekhar bawankule targets uddhav thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Sanjay Shirsat | अंबादास दानवे शिवसेनेत प्रवेश करणार?, संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट
Bachchu Kadu | ‘राष्ट्रवादीची बॅनरबाजी एकप्रकारची मुर्खता’, बच्चू कडूंनी राष्ट्रवादीला सांगितला नियम